धक्कादायक! कठुआत CISF छावणीत जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

Jammu & Kashmir Soldier opens fire : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बसोलीत जवानानं सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.

News Photo   2026 09 29T210847.500

Jammu & Kashmir: Soldier opens fire

Jammu & Kashmir Soldier Opens Fire :  जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील (Jammu) बसोली परिसरात CISF छावणीत धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी ७ वाजुन १० मिनिटांच्या सुमारास एका जवानानं आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला. या घटनेत चार जवानांचा मृत्यू झाला असुन मृतांमध्ये असिस्टंट कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. घटनास्थळी कठुआ पोलिसांचं पथक दाखल झालं असुन आरोपी जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ही घटना हिमाचल प्रदेशच्या सीमेजवळ आणि चंबा जिल्ह्याला लागुन असलेल्या परिसरात घडली. जवानांमध्ये झालेल्या वादानंतर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हा प्रकार आपापसातील वादातुन झाल्याचं मानलं जात होतं, मात्र गोळीबारामागचा नेमका हेतू आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडुन घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.

‘ज्ञानेश कुमार नव्हे, त्यांच्या बॉसच्या राजीनाम्याची मागणी करा’; अरविंद केजरीवालांचा कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला

दरम्यान, या गंभीर घटनेची दखल CISF मुख्यालयानं घेतली असुन चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. CISFचे महासंचालक संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवुन आहेत. आरोपी जवानाकडुन गोळीबार नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास केला जात आहे. घटनेतील मृत जवानांची ओळख आणि इतर तपशीलाबाबतही संबंधित यंत्रणांकडुन माहिती गोळा केली जात आहे.

CISFची स्थापना १९६८ मध्ये करण्यात आली होती. गृह मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत असलेलं हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सध्या देशातील महत्वाच्या राष्ट्रीय आस्थापनांना सुरक्षा पुरवतं. सुरुवातीला ३,१२९ जवान असलेल्या या दलाची संख्या आता २,२०,००० पर्यंत पोहोचली आहे. देशभरातील ७० विमानतळांसह ३६१ महत्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी CISFकडे आहे. सुरक्षेच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी दलाकडे १२ राखीव बटालियन असुन देशभरात आठ अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.

Exit mobile version