राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. (NCP) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रीवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
प्रफुल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आता फक्त औपचारिकता बाकी असून, येत्या 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होईल अशी माहिती समोर आली आहे.
अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; रोहित पवारांचा दिल्लीतील गुप्तहेर संस्थेशी संपर्क
आज देवगिरी बंगल्यावर आमदाराची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रफुल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं. आता येत्या 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक होणार आहे, या बैठकीत याबाबत घोषणा होणार आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्रिपदासोबतच त्यांच्याकडे इतरही काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. विधिमंडळाचा गट नेता म्हणून देखील त्यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे.
