‘तू’ म्हणून का बोलतोस? कल्याणमध्ये डॉक्टरला रुग्णाच्या मुलाची मारहाण

Kalyan Doctor Assaulted कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना रुग्णाच्या नातेवाईकाने केबिनमध्ये मारहाण केली

Kalyan Doctor Assaulted

Kalyan Doctor Assaulted

Doctor Assaulted by Patient’s Relative in Kalyan: रुग्णावर उपचार करताना डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये वाद होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच कल्याण पूर्वेत डॉक्टरला मारहाण (Kalyan Doctor Assaulted) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये (Bhanu Jyot Hospital) डॉक्टर योगेंद्र जयस्वाल (Dr. Yogendra Jaiswal) यांना रुग्णाच्या नातेवाईकाने केबिनमध्येच मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

औषध कसे द्यायचे सांगताना वाद

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाला औषध कशा पद्धतीने द्यायचे, याबाबत डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे त्याच्या नातेवाईकाला समजावून सांगत होते. यावेळी डॉक्टर आणि रुग्णाचा मुलगा विनीत देशमुख यांच्यात शाब्दिक वाद झाला.

रोहित पवारांच्या PAच्या मुलीच्या मृत्यूचे गूढ उलगडले; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

विनीत देशमुख डॉक्टरांना ‘अरे..तुरे..’ म्हणून संबोधत होता. त्यामुळे डॉ. योगेंद्र जयस्वाल यांनी विनीतला “आपल्याला अरे तुरे करु नका, मी तुम्हाला तुम्ही म्हणून संबोधतोय” असे सांगितले. यावरुनच वाद वाढल्यानंतर त्याने डॉक्टरांशी अरेरावी करत मारहाण केली, असा आरोप विनीतवर करण्यात आला आहे.

रुग्णाने मुलाला बाहेर जाण्यास सांगितले

वाद वाढत असल्याचे पाहून रुग्णाने आपल्या मुलाला बाहेर जाण्यास सांगितल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतरही तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टरांना हाणामारी करु लागला. या संपूर्ण घटनेचे दृश्य हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

जुन्नरमध्ये NIAची छापेमारी; निघालं ऑपरेशन सिंदूरशी कनेक्शन

या हल्ल्यामुळे डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मानसिक धक्का बसला असून, रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात विनीत देशमुख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याची माहिती आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

FDA ची मोठी कारवाई; नागपुरात 2 कोटींचा भाजलेल्या सुपारीचा साठा जप्त

डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

डोंबिवलीनंतर कल्याणमध्येही डॉक्टरवर हल्ल्याची घटना समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रमक वर्तनाला सामोरे जावे लागते. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी उपचाराबाबत काही शंका किंवा तक्रार असल्यास डॉक्टरांशी चर्चा करून तोडगा काढावा; मात्र कायदा हातात घेणे योग्य नाही, अशी भूमिका वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version