FDA ची मोठी कारवाई; नागपुरात 2 कोटींचा भाजलेल्या सुपारीचा साठा जप्त

Tukaram Mundhe : अन्न व औषध विभागाकडून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित व नियमबाह्य अन्नपदार्थांच्या साठवणूक

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : अन्न व औषध विभागाकडून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित व नियमबाह्य अन्नपदार्थांच्या साठवणूक, विक्री व वितरणाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध विभागाने आतापर्यंत लाखो रुपयांचे मुद्देमाल देखील जप्त केले असून  संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन कारवाई देखील करण्यात आली आहे. तर आता नागपुरात अन्न व औषधेविभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नागपुरात (Nagpur) एफडीएने (FDA) तब्बल 55 हजार 996 किलो भाजलेल्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. माहितीनुसार, या साठ्याची अंदाजे किंमत 2 कोटी 23 लाख 98 हजार 400 रुपये आहे.

एफडीएने 24 ऑगस्ट रोजी गौरीश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, कळमना, नागपूर या आस्थापनेवर छापा टाकला असता कारवाईदरम्यान 55 हजार 996 किलो भाजलेल्या सुपारीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 2006 च्या अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येत असल्याची देखील माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

यावलमध्ये 396.8 किलो संशयित सोयाबीन तेलाची नोंद

तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद येथील  झम झम किराणा या दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले  सैल सोयाबीन शुद्ध खाद्यतेल संशयास्पद आढळून आले.

‘या’ भागात 35 रुपये किलो मिळणार कांदा; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

उपलब्ध नोंदीनुसार या संशयित सोयाबीन तेलाचा एकूण 396.8 किलो साठा असल्याचे आढळले. तेलाचा नमुना पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या तेलाची गुणवत्ता आणि त्यात भेसळ आहे किंवा नाही, याबाबत अंतिम निष्कर्ष काढला जाणार आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेणार नाही – तुकाराम मुंढे

महाराष्ट्रात अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अुंमलबजावणीबाबत प्रशासनाची कठोर भूमिका आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेणार नाही. नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यात कुणी भेसळ केल्यास वा प्रतिबंधित पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा उत्पादन केल्याचे आढळल्यास अधिक कठोर करावाई करण्यात येत असून पुढेही सतत चालू राहील असल्याची प्रतिक्रिया अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

follow us