रोहित पवारांच्या PAच्या मुलीच्या मृत्यूचे गूढ उलगडले; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Rohit Pawar’s PA’s Daughter Death Case: रोहित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या 14 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला.

Rohit Pawar’s PA’s Daughter Death Case

Rohit Pawar’s PA’s Daughter Death Case: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूबाबत निर्माण झालेला संशय अखेर दूर झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागे कोणताही घातपात किंवा अन्य व्यक्तीचा सहभाग नसल्याचे समोर आले आहे. मुलीनेच स्वत:चे जीवन संपवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मुलीने आई रागावल्याच्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासातून समोर आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नेमकं काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी ही अल्पवयीन मुलगी आई रागावल्यामुळे नाराज होऊन घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

जुन्नरमध्ये NIAची छापेमारी; निघालं ऑपरेशन सिंदूरशी कनेक्शन

पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असतानाच शहरातील एका इमारतीत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आणि मृत्यूबाबत विविध शक्यता व्यक्त होऊ लागल्या. ही घटना समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली होती. मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने सर्व शक्यता तपासून पाहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या.

तपासानंतर पोलिसांचा खुलासा

मुलीच्या मृत्यूची परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये मुलगी इमारतीच्या जिन्यातून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन तिने उडी मारल्याचे दिसले, असे पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सांगितले.

Onion Price : ‘या’ भागात 35 रुपये किलो मिळणार कांदा; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालातूनही मुलीने स्वतःच आपले जीवन संपवले असे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळून आलेला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे.

follow us