जिल्हा बँकेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क!

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनीही राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Untitled Design   2026 11 02T093823.004

Untitled Design 2026 11 02T093823.004

Dr. Sujay Vikhe Patil exercised his right to vote! : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, राजकीय नेत्यांकडूनही आपला मतदानाचा हक्क बजावला जात आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनीही राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आर्थिक संस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. शेतकरी, कष्टकरी, दूध उत्पादक आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बँक आर्थिक आधारस्तंभ म्हणून काम करते. त्यामुळे या बँकेच्या कारभाराची धुरा कोणाच्या हाती जाणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हा बँकेच्या रणांगणात आज मतांची लढाई; विखे-थोरात की निलेश लंके?राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

दरम्यान, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांचे हित जपले जावे, बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम आर्थिक आधार मिळावा आणि सहकार क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या सहकार पॅनल आणि खासदार निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जाणार आणि जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित कोणाच्या बाजूने झुकणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version