Eknath Shinde Complaint of Fadnavis and Chavan’s to Amit Shah : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी शाह यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
मेष ते मीन, कसं आहे आजचं बाराही राशींचं राशिभविष्य जाणून घ्या सविस्तर…
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब स्मारक समितीमध्ये घेतलं यावरून नाराजी व्यक्त केली आहे. आपली शिवसेना खरी ठाकरेंना समितीवर घेण्याचे कारण काय? असं त्यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली सह अनेक भागांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. त्यातून भाजपने शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना आणि अनेक माजी नगरसेवकांना फोडला आहे यावरून शिंदेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान यावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मी तक्रारीचा पाढा वाचला नाही. कारण मी रडणारा नाही तर लढणारा नेता आहे. आम्ही छोट्या-मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. स्थानिक निवडणुकीचा विषय दिल्लीपर्यंत नेत नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसलो. त्यामध्ये चर्चा झाली, त्यातून महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही. याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. अशी चर्चा झाली. त्यामुळे हा विषय दिल्लीपर्यंत गेलेला नाही. असं म्हणत शिंदेंनी मात्र या सर्व चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.
