मोठी बातमी! गुटखा माफियांची आता खैर नाही; मकोका लागणार, तुकाराम मुंडेंचे थेट आदेश

केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार,वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे. यामधून कोणाचीही सुटका होणार नाही

News Photo   2026 06 12T201245.720

मोठी बातमी! बेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; मकोका लागणार, तुकाराम मुंडेंचे थेट आदेश

प्रशासनातील धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडका लावला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. यासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान आता राज्यातील गुटखा माफियांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. याबाबत स्वत: तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.

भेसळ ओळखा, सुरक्षित अन्न निवडा; फूड सेफ्टी ऑन व्हील्स मोहिमेतून प्रशासनाकडून नागरिकांना मार्गदर्शन

गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध वापाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार,वाहतूकदारांवरही कारवाई होणार आहे. यामधून कोणाचीही सुटका होणार नाही, असा इशाराच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. गोदाम चालक आणि घाऊक तसेच किरकोळ विक्रेतेही एफडीएच्या रडावर असणार आहेत.

प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार आता संघटित गुन्हा मानला जाणार आहे, जर अशा अन्नपदार्थांचा व्यापार कोणी करत असेल तर त्याच्यावर आता थेट मकोका अतंर्गत कारवाई होणार आहे. त्यामुळे आता गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क्सविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ म्हणजेच मकोका लागू करण्यात येणार आहे.

Exit mobile version