Rashibhavishya Today 21 November 2026: आज शनिवार, 21 नोव्हेंबर 2026. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पाहायला मिळणार आहे. काही राशींसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो, तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कुणाला जोडीदाराकडून प्रेमाची साथ मिळेल, तर कुणाला कामाच्या ठिकाणी मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. मेष ते मीन या सर्व 12 राशींसाठी आजचा शनिवार कसा असेल? आर्थिक व्यवहार, नोकरी-व्यवसाय, कुटुंब आणि प्रेमजीवनाच्या दृष्टीने आजचे राशिभविष्य जाणून घेऊया.
मेष
आज कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. सतत काम केल्याने थकवा जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. घरी नातेवाईकांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराकडून मिळणारे प्रेम आणि आपुलकी तुम्हाला सुखावेल. घरातील कामांचे नियोजन कराल, मात्र वेळेअभावी काही कामे पुढे ढकलावी लागू शकतात. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, पण केवळ कल्पनांमध्ये रमून राहू नका.
वृषभ
आज आरोग्याची आणि विशेषतः बसण्याच्या पद्धतीची काळजी घ्या. घरातील एखाद्या कार्यक्रमामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन बिघडणार नाही, याची दक्षता घ्या. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल, मात्र वाहन चालवताना सावध राहा. प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे क्षण अनुभवता येतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नात्यांचे महत्त्व अधिक जाणवेल. बाहेर जाण्यापूर्वी आपल्याला कोणाची साथ आवडते, याचा विचार करा.
मुंबई-ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना बढतीचा ‘डबल धमाका’; दुबेरे आणि देवेन भारती महासंचालक श्रेणीत
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरू शकतो. स्वतःबद्दल समाधान वाटेल अशा काही गोष्टी घडतील. पैसे कमावण्याच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांना वेळ द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. प्रेमसंबंधांमध्ये जुन्या चुका विसरून नात्याला नवी संधी देणे फायदेशीर ठरेल. बांधकामाशी संबंधित कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होऊ शकतात. जोडीदारासोबत खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिरेक टाळा. शुभचिंतकांपासून विनाकारण दूर राहू नका.
कर्क
आज मन थोडे अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होऊ शकते. आर्थिक बाबतीत काही अडचणी आल्या तरी तुमच्या कौशल्याच्या जोरावर त्यातून मार्ग काढू शकाल. मुलांसोबत वेळ घालवून त्यांना योग्य गोष्टी समजावून सांगा. जोडीदाराची अनुपस्थिती जाणवू शकते. शक्य तितका वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा करण्यासाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो.
सिंह
आजचा दिवस आनंद आणि मनोरंजनात घालवण्याची संधी मिळेल. प्रवासामुळे थकवा आणि ताण जाणवू शकतो, पण त्यातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल, मात्र त्यांच्या अपेक्षाही वाढू शकतात. स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्याची इच्छा असूनही कामाच्या व्यापामुळे वेळ मिळणार नाही. जोडीदारासोबत गैरसमज निर्माण झाल्यास शांतपणे चर्चा करा. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे टाळा.
कन्या
आज कोणत्याही समस्येला शांतपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे फायदेशीर ठरेल. गुंतवणूक आणि भविष्यातील आर्थिक योजनांची माहिती इतरांना देताना सावध राहा. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. प्रेमसंबंधांमध्ये दिखावा करण्याऐवजी स्वतःचा खरा स्वभाव जपा. जुन्या मित्रांची भेट घडवून आणण्याचा विचार करू शकता. वैवाहिक आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. पुरेशी विश्रांती घेतल्याने ताजेतवाने वाटेल.
तुळ
आज मित्रमैत्रिणींसोबत संध्याकाळ आनंदात जाईल. मात्र खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिरेक करू नका. बऱ्याच दिवसांपासून कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर आज सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या वागणुकीकडे लक्ष द्या आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवता येईल. कामाच्या व्यापामुळे वैयक्तिक आवडींना वेळ देणे कठीण होऊ शकते. मित्रांसोबत चित्रपट पाहण्याचा बेत आखू शकता.
पोलीस भरतीतील तरुणींसाठी मोठा दिलासा, तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ; जाणून घ्या कारण
वृश्चिक
आज नकारात्मक विचारांपासून दूर राहून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असून कर्जातून मुक्त होण्याचा मार्गही मिळू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधांमध्ये अधिकार गाजवण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील लहान सदस्यांसोबत बाहेर फिरण्याचा आनंद घेता येईल. जोडीदारासाठी आवडीचा पदार्थ बनवल्याने नात्यातील जवळीक वाढू शकते.
धनु
आज स्वतःचे मत मांडताना अजिबात संकोच करू नका. आत्मविश्वास कायम ठेवल्यास प्रगतीच्या संधी मिळतील. पैशांचे योग्य नियोजन आणि बचत भविष्यात उपयोगी ठरू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. जुन्या मित्रांच्या आठवणींना उजाळा मिळेल. मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत मतभेद झाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराची साथ आणि प्रेम तुम्हाला मानसिक समाधान देईल.
मकर
आज काही भावनिक प्रसंगांमुळे मनावर ताण येऊ शकतो. मात्र सकारात्मक विचार आणि धैर्याच्या जोरावर परिस्थिती हाताळता येईल. आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नका. नातवंडांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने ज्ञानात भर पडेल तसेच नवीन लोकांशी ओळख होईल. जोडीदारासोबत रोमँटिक डेटचे नियोजन केल्यास नाते अधिक घट्ट होईल.
कुंभ
आज इतरांना मदत करण्याची तुमची वृत्ती तुम्हाला मानसिक समाधान देईल. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. व्यस्त दिनक्रमातून स्वतःसाठी वेळ काढण्यात यश मिळेल. रिकाम्या वेळेत एखादे सर्जनशील काम करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या छोट्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील एखादी व्यक्ती मनातील समस्या तुमच्याशी बोलू शकते. तिला योग्य मार्गदर्शन करा.
मीन
आजचा दिवस आरामदायी आणि आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडे भेट दिल्याने दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट झाल्यास प्रेमभावना अधिक दृढ होतील. व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसतील. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण अनुभवता येतील. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याचा आनंद घ्या, मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा.
