IIT Bombay; Sahil Wakode Case: मुंबई आयआयटीत (IIT Bombay) घडलेल्या साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी (Sahil Wakode Case) मुंबई आयआयटीतील प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. साहिलने आयआयटी मुंबईत आपले जीवन संपवल्या प्रकरणी साहिलच्या आई-वडीलांनी प्रा. सूर्यनारायण डुल्ला आणि प्रा. शिरीष केदार यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी आयआयटी मुंबईच्या बाहेर आंदोलनही केले आहे. साहिलनेचॅट जीपीटीच्याद्वारे परिक्षेत कॉपी केली असे आयआयटी प्रशासनाचे मत आहे. तर साहिलला जातीवाचक अपशब्द वापरले असा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला आहे. परिक्षेच्या वेळी पर्यवेक्षक सूर्यनारायण डुल्ला हे होते.
फटाके-डीजेच्या दणदणाटाला उच्च न्यायालयाचा दणका; विद्यानंद बापट म्हणाले, ‘सर्व वाद्यांवर बंदी हवी’
साहिल वाकोडे यांच्या पालकांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आयआयटीने प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना तपास पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी आयआयटी-बॉम्बेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने 10 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आयआयटीची ही समितीही संबंधित परिस्थितीची चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. समितीला एका आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशी आणि तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर
दरम्यान, साहिल वाकोडे प्रकरणासंबंधी प्रा. सूर्यनारायण डुल्ला आज मुंबई क्राईम ब्रांचसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांचा जबाब नोंदवणार आहेत.
प्रा. डुल्ला यांच्यावर साहिल वाकोडे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात साहिल यांच्या पालकांचा जबाब क्राईम ब्रांचने 22 सप्टेंबर रोजी नोंदवला होता. त्यानंतर आता प्रा. डुल्ला यांचा जबाब नोंदवून तपास पुढे नेला जाणार असल्याची माहिती आहे.
