Video : पुणे मुंढवा भूखंड गैरव्यवहारात पार्थ पवारांचा सहभाग, विजय कुंभार यांनी दिला मोठा पुरावा

पुण्यातील मुंढव्याचा शासकीय भूखंड प्रकरणात शितल तेजवानी अटक असताना आता पार्थ पवार यांच्याविरोधात मोठा पुरावा समोर आला आहे.

News Photo   2025 12 16T170427.320

पुणे मुंढवा भूखंड गैरव्यवहारात पार्थ पवारांचा थेट सहभाग, विजय कुंभार यांनी थेट पुरावाच दिला

पुण्यातील मुंढव्याचा शासकीय भूखंड हा शितल तेजवानी मार्फत लाटण्यासाठीच (Pune) पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीची स्थापना केली असावी, असा गंभीर आरोप माहिती विजय कुंभार यांनी केला आहे. विशेष म्हणजे तेजवानी हिने मुंढवा जमिनीची नजराना भरण्यासाठीचं पत्र दिल्यानंतरच अमेडिया कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर तेजवानीच्या या पत्रावर पुढे कार्यवाही होत नाही म्हणून पार्थ पवार यांनी पुणे जिल्हा प्रशासनाला स्मरण पत्र दिल्याचं समोर आले आहे.

यावेळी कुंभार यांनी पार्थ पवारांच्या सहभागाचा पुरावाच दिला आहे. पार्थ पवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लिहीलेले पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या हाती लागले आहे. पार्थ पवार यांचा सहीचे हे पत्र आहे. या पत्रावरुन असं स्पष्ट होते की पार्थ पवार यांनी जमीन मिळवण्यासाठी स्वत: पाठपुरावा केला होता असं यामधून दिसून येत आहे. पार्थ पवार यांनी 1 जून 2021 ला लिहिलेलं पत्र विजय कुंभार यांच्या हाती लागले आहे. 4 वर्षांपासून पार्थ यांचा जमिनीसाठी पाठपुरावा सुरु होता असंही कुंभार यावेळी म्हणाले आहेत.

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल; मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव का नाही?

त्याचबरोबर पार्थ पवारांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. वतनदारांच्या वारसांच्या नावे जमीन करण्याची मागणी पार्थ पवारांनी केली. पार्थ पवारांचा जमिनीवर 4 वर्षांपासून डोळा होता. यावेळी कुंभार यांनी पार्थ यांचा जमीन प्रकरणात थेट सहभाग आहे असा दावा कागदपत्रांसह केलं आहे.  दरम्यान, कुंभार यावेळी म्हणाले, आता मुख्यमंत्री आणि तपास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ न करता कारवाई करावी आणि लोकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पार्थ पवार यांचं पत्र जसे आहे तसे

अर्जदार
श्री. पार्थ पवार,
पुणे.
ता. ०१/०६/२०२१
प्रति,
अप्पर जिल्हाधिकारी साहेब,
कुळकायदा शाखा,
जिल्हाधिकारी कार्यालय,
पुणे.
विषयः- मौजे मुंडवा ता. हवेली जिल्हा पुणे येथील स.न.८८ या मिळकती संदर्भात मा. जिल्हाधिकारी ह्यांच्याकडे ता. १०/११/२०२१ रोजी दाखल प्र. क्र. PTK / कावि /१३५६/२०२० ची तत्काळ सुनावणी होणे बावत,
संदर्भ :- मौजे मुंडवा येथील स.न. ८८ ता. हवेली जिल्हा पुणे या मिळकती मधील मा. मंत्री (महसूल) यांचे कडील निर्णय क्रमांक बीआयडब्लू/३४९६/सी आर /२०५ / ल-४ ता. १८/११/१९९४ अन्वये मुळ वतनदारांना उपरोक्त मिळकत रिग्रॅट झालेली असल्या कारणाने सदर वतनदारांतर्फे कब्जे हक्काच्या सा-याची रक्कम भरून घेणे बाबत,
महोदय,
तुकडी पुणे पोट तुकडी ता. हवेली मौजे मुंडवा जिल्हा पुणे यांसी स.न.८८ येथील मिळकत वतनदार यांच्या वडिलोपार्जित मालकी वहीवाटीची आहे.
पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या स.न. ८८ ही मिळकत तत्कालीन ब्रिटिश सरकार ने समाज सेवा पुरविणा-या वतनदार याना प्रदान केलेले असून या इनामाला इनाम वर्ग-६व असे संबोधले जाते. आदेश दि. १३/०९/१९५५ अन्वये सदर क्षेत्र सरकार जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांनी जारी करेपर्यंत ते मुळ वतनदारांच्या ताब्यात व वहीवाटीची होती.
दि. १८/११/१९९४ रोजी मा. मंत्री (महसूल) यांचे कडील निर्णय क्र. बीआयडब्लू/३४९६ / सी आर /२०५/ल-४ अन्वये वरील दि.१३/०९/१९५५ चा आदेश रद्द झालेला असून सदर मिळकत ही मा. मंत्री (महसूल) यांच्या उपरोक्त आदेशा नुसार मुळ वतनदार यांस रिग्रॅट झालेली आहे.
मा. मंत्री (महसूल) यांचा निर्णय क्र. बीआयडब्लू/३४९६/सी आर/२०५/ल-४ न मौजे वानवडी व मौजे मुंड़वा ह्या जमिनीतील वतनदाराना मिळकत रिग्रेट करण्याचा असून त्यापैकी मौजे वानवडी येथील सर्वे नं. ६४ या मिळकती संदर्भात शासकीय नियमानुसार सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण झालेली आहे. ता. १०/११/२०२० रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे वतनदार मुखत्यार ह्यानी मा. मंत्री (महसूल) महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये मौजे मुंढवा येथील स.न. ८८ ह्या आमच्या मिळकतीचा योग्य तो कब्जे हक्काचा सारा स्विकारुन सदर मिळकतीच्या ७/१२ स मालकी सदरी नावाची नोंद व्हावी याकामी एक अर्ज दाखल केलेला आहे.
सदर अर्ज मा. जिल्हाधिकारी ह्यांच्या कार्यालयाने तहसीलदार हवेली ह्यांच्याकडे ता.१५/१२/२०२० रोजी वर्ग केला व सदर अर्जातील विषयानुरूप मिळकतीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा असा मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केला आहे.
परन्तु ता. १५/१२/२०२० पासून आजपावेतो सदर अर्जाबाबत पुढील काहीही कामकाज झालेले नसल्याने वतनदार मुखत्यार ह्यांच्यातर्फे प्रस्तुत अर्जदार ह्यानी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
तरी आपणास विनंती की, ता. १०/११/२०२१ रोजी वाचस प्र. क्र. PTK / कावि /१३५६/२०२० ची तत्काळ सुनावणी करून ता. १०/११/२०२० मधील अर्जात नमूद केल्याप्रमाणे वतनदारांतर्फे कब्जे हक्काच्या सा-याची रक्कम भरून घेवून मिळकतीच्या ७/१२ च्या रेकॉर्ड ला मूळ वतनदार मुख्त्यार ह्यांची नावे लावण्यात यावीत ही विनंती.
आपला कृपभिलाषी, (श्री. पार्थ पवार)

 

Exit mobile version