उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल; मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव का नाही?
घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल.
Why is Parth Pawar’s name not in the land scam? : पुण्यातील मुंडवा येथील 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. अनेक नाट्यमयी घटना या प्रकरणात घडत आहेत. आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेचा विषय ठरतंय. ते म्हणजे या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या मुलाचं नाव का नाही? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) विचारला आहे. गेल्या महिनाभरापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया(Anjali Damania) आणि राजकीय विरोधकांकडून राज्य सरकार तसेच पोलिसांच्या कार्यपध्द्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. जो प्रश्न या सगळ्यांकडून विचारला जात होता, चक्क तोच प्रश्न आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला. पोलिसांनी(Police) या प्रश्नावर त्यांची भूमिका मांडली असली तरी, पार्थ पवार(Parth Pawar) यांच्या नावाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवाणीची दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर, तिने जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.
राज्यात भीक मागण्यास बंदी! विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर
मुंबई उच्च न्यायालयात मुंढवा जमीन प्रकरणी सुरू असलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असा थेट सवाल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आमचा तपास सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी न्यायालयात मांडली. शीतल तेजवानीने बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर, हायकोर्टाकडून अजित पवारांच्या मुलाचे नाव का नाही, असा थेट सवाल विचारण्यात आला.
दरम्यान, मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानी यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केलेला असताना आणि न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असताना थेट उच्च न्यायालयात आल्याबद्दल न्यायालयाने नाराजी देखील व्यक्त केली. उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर याचिका मागे घेत असल्याची माहिती वकिलांनी दिली. मात्र, या सुनावणीमुळे पुन्हा एकदा पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, पोलिसांच्या एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव येणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
