बीडमध्ये किरकोळ वादातून गोळीबार; वाल्मिक कराड कनेक्शन?, वातावरण तापलं
वजाहत खान यांनी सांगितले की, GHQमधील तीन अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून इम्रान खान आता आपल्यात नसल्याची भीती व्यक्त केली आहे. इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून आणि बाहेरील जगापासून दूर ठेवले जात असल्यामुळे ही शंका निर्माण झाली असल्याचेही त्यांनी म्हटले.
Video : ‘जंतर-मंतर सीझन-2’ लवकरच…; CJP संस्थापक अभिजीत दिपकेंचे संकेत
मात्र, पत्रकाराने स्वतः या माहितीची पुष्टी केलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसून, त्यांनी इतरांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही भीती व्यक्त केली असल्याचे वजाहत खान यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा दावा सध्या केवळ एक शक्यता किंवा चिंता असून, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफची मागणी
इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्या पक्षाने मंगळवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर आंदोलन केले. त्यांच्या कुटुंबीयांना तसेच वैयक्तिक डॉक्टरांना इम्रान खान यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफकडून करण्यात आली.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, बाळासाहेबांचा उल्लेख अन् कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे सरचिटणीस सलमान अक्रम राजा यांनी न्यायालयाच्या रजिस्ट्रारची भेट घेतल्यानंतर सांगितले की, इम्रान खान यांच्याशी संबंधित प्रकरणे पुढील आठवड्यात सुनावणीसाठी निश्चित करण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यानंतर पक्षाने आंदोलन मागे घेतले.
2023 पासून इम्रान खान तुरुंगात
73 वर्षीय इम्रान खान यांना 5 ऑगस्ट 2023 रोजी तोशाखाना प्रकरणातील दोषसिद्धीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधात अनेक प्रकरणे असून काही प्रकरणांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे, तर काही खटले अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत.
Rashtriya Swayamsevak Sangh : जबाबदारी ओळखून प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी योगदान देणे आवश्यक
इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत आधीपासूनच त्यांच्या पक्षाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच पाकिस्तान हेडक्वार्टर्स मधील तीन अधिकाऱ्यांच्या कथित भीतीचा दावा समोर आल्याने पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या उपलब्ध नाही.
Pakistani journalist Wajahat Khan says his military sources claim Imran Khan is no longer alive. pic.twitter.com/dj1amG7Hqn
— IntelHQ (@IntelHQ26) August 12, 2026
