Download App

Exclusive : 11 वर्ष पदं भोगली, सगळं खेचून आणलेलं श्रेय! एकनाथ शिंदेंवर मनसे नेत्याचा हल्लाबोल

मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली.

  • Written By: Last Updated:

Avinash Jadhav Criticize Eknath Shinde :  मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं. एकनाथ शिंदेंना घेरण्याची संधी त्यांनी सोडली नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर देखील त्यांनी उत्तर दिलं.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

या महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले. आमच्या ठाण्याला पण एक मुख्यमंत्री (Eknath Shinde) भेटला, पण त्याने एक रस्ता ठाण्याला दिला नाही, अकरा वर्ष त्यांनी अनेक पद भोगली. परंतु रस्ते तसेच राहिले. पुढचे पाच वर्ष देखील नवीन रस्ते होण्याची काही चिन्हे दिसत नाही, असा पहिला वार अविनाश जाधव यांनी (Avinash Jadhav) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. चारही बाजुने आम्ही ट्राफिकमध्ये आहोत, शहराला प्लॅनिंग लागतं, आमच्या शहराला ते प्लॅनिंग नाही, असंही जाधव (MNS) म्हणाले.

खेचून आणलेलं श्रेय

एकनाथ शिंदे यांची काम करणारा मुख्यमंत्री अशी ओळख आहे, यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले मी पण रोज काम करतो, पण मी काम करताना व्हिडिओ बनवून टाकत नाही. व्हिडिओ टाकून काम करणं आणि रस्त्यावर उतरून काम करणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहे. त्यांचं ठाण्यात डबल इंजिन आहे, ही बाळासाहेबांची कृपा आहे. उद्धव ठाकरेंनी यांना तिकीट दिलं नसतं, तर त्यांचा मुलगा खासदार झाला असता का? उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिलं नसतं, तर शिंदेंनी पक्ष फोडला असता का? हे सगळं खेचून आणलेलं श्रेय आहे, ते जास्त काळ टिकवता येत नाही, असा टोला देखील अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

शिवसेना हा पक्ष ठाणे जिल्ह्यापूर्ता आहे. त्यांचे बाकीचे आमदार स्वयंभू आहेत. शिंदेंनी आतापर्यंत एकही निवडणूक स्वतंत्र लढवलेली नाही, आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढले तेवढे भारतीय जनता पक्षासोबत होते. एखादी निवडणूक एकटे लढल्यानंतर कळेल गाय गाभण आहे की, नुसती चर्चा आहे.

माझ्यासाठी त्यांचा विषय संपला

प्रकाश महाजन यांच्या राजीनाम्यावर बोलताना अविनाश जाधव यांनी म्हटलंय की, माझ्यासाठी त्यांचा विषय संपला. प्रकाश महाजन हे ज्येष्ठ नेते होते. आमचं वडिल-आणि मुलगा असं नातं होतं. परंतु राज साहेबांपुढे माझ्यासाठी कोणताही विषय नाही, त्यांनी राजीनामा दिला माझ्यासाठी विषय संपला. ही नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. मी एका झोपडपट्टीत राहायचो, मला आणलंच ना? असं देखील जाधव यांनी म्हटलंय. आमच्याकडे लाखो लोकं आहेत. गेलेल्यांचं आम्हाला दु:ख आहे. परंतु राज साहेबांच्या पुढे कोणीच नाही, असं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलंय.

मैत्रीच्या दुनियातले राजा माणूस

महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारायची असेल, तर दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे, अशी ईच्छा देखील अविनाश जाधव यांनी बोलून दाखवली आहे. राज साहेब हे मैत्रीच्या दुनियातले राजा माणूस आहेत. त्यांचे दरवाजे नेहमीच मित्रांसाठी खुले असतात, सामान्य कार्यकर्त्यांसाठी देखील खुले असतात, असं देखील जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us