Sanjay Raut Criticizes Modi Shinde Meeting : शिंदे गटातील सहा खासदारांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची दिल्लीत भेट घेतल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संबंधित खासदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असताना त्यांची पंतप्रधानांसोबत झालेली भेट आणि ‘मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करु नका” असं म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवला जाणे योग्य आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Shiv Sena : शिवसेना खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला
“पंतप्रधान मोदींनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे”
शिंदे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी उपरोधिक शब्दांत टीका केली. “पंतप्रधान मोदींनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे. ते गद्दारांना भेटतात, चहापाणी ठेवतात. राहुल गांधी, अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना ते का भेटत नाहीत?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
न्यायालयीन प्रकरणाचा दाखला देत सवाल
संबंधित खासदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना पंतप्रधानांनी त्यांची भेट घेणे आणि त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगणे योग्य आहे का, अशा राजकीय भेटींचा न्यायालयीन प्रकरणावर काही परिणाम होऊ शकतो का, तसेच न्यायालयावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे का, याचा विचार झाला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंवरही राऊतांचा टोला
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने शिंदे अस्वस्थ असल्याचा टोला त्यांनी लगावला. “एकनाथ शिंदे दिवसभर पंतप्रधानांच्या बेडरूममध्ये बसतील, त्यांचे काम काय आहे? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्यांना झोप लागत नाही,” असे राऊत म्हणाले.
“शिंदे गट ही मोदी-शहांची कंपनी”
एकनाथ शिंदे यांच्या पक्षावरही संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला. शिंदे गटाचे राजकीय नेतृत्व प्रत्यक्षात नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत असल्याचा दावा त्यांनी केला. “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख मोदी आणि शहा आहेत. शिंदे गट ही मोदी-शहांची कंपनी आहे. त्यामुळे त्यांना जाऊन हिशोब द्यावा लागतो,” अशी टीका राऊत यांनी केली.
मनोज जरांगेंचा माढ्यातून सरकारला थेट इशारा; वेळ पडली तर कोणाचा जीवही घेऊ…
दरम्यान, शिंदे गटातील खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली भेट आणि त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
