Muhurat Trading : ‘मुहूर्त ट्रेडिंग’ दरम्यान गुंतवणूकदार होणार मालामाल ; 7 वर्षांचा डेटा काय सांगतो?

Muhurat Trading : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.

Muhurat Trading

Muhurat Trading

Muhurat Trading : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने गुंतवणूकदांची धाकधूक वाढली आहे. यातच आता बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी शेअर बाजारात होणाऱ्या मुहूर्त ट्रेंडिंग साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुहूर्त ट्रेंडिंग दरम्यान चांगला परतावा मिळवण्याची संधी किरकोळ गुंतवणूकदारांना असते. गेल्या सात वर्षात म्हणजेच  2018 ते 2025 या काळात दिवाळीच्या ‘मुहूर्त ट्रेडिंग’ मध्ये कधीही नकारात्मक परतावा मिळालेला नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक सातत्याने सकारात्मक राहिले आहेत.

मुहूर्त ट्रेंडिंग दरम्यान सेन्सेक्सची कामगिरी

आकडेवारीनुसार 2018  ते 2025 या काळातील कोणत्याही ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्रात सेन्सेक्सने (Sensex) नकारात्मक परतावा दिलेला नाही. बीएसईच्या (BSE) आकडेवारीनुसार, 2025 मध्ये सेन्सेक्सने 0.07 % परतावा नोंदवला. जो गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेअर्सचे (Stock Market) उच्च मूल्यांकन. याउलट, 2022 च्या ‘मुहूर्त ट्रेडिंग’ (Muhurat Trading) सत्रात सर्वाधिक परतावा दिसून आला, जेव्हा सेन्सेक्स 0.87% वाढीसह बंद झाला. 2018 ते 2025 दरम्यान, तीन वेळा असे घडले जेव्हा गुंतवणूकदारांना ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्रात 0.50% पेक्षा जास्त परतावा मिळाला. 2018 मध्ये सेन्सेक्सने 0.70% आणि 2023 मध्ये 0.54 % वाढ दर्शवली.

निफ्टीची कामगिरी

उच्च मूल्यांकनांमुळे 2018 ते 2025 या काळात निफ्टीचा (Nifty) परतावा सर्वात कमी, म्हणजेच 0.10% राहिला असला, तरी या सात वर्षांत तो कधीही  तोट्यात गेला नाही. 2022 मध्ये निफ्टीने 0.87% परतावा दिला, जो 2018 नंतरचा सर्वाधिक परतावा होता. 2018 (0.65% परताव्यासह) आणि 2023 सारख्या वर्षांतही ‘मुहूर्त ट्रेडिंग’च्या दिवशी निफ्टीने 0.50% पेक्षा जास्त परतावा नोंदवला होता. 2022 पासून परतावा सकारात्मक राहिला असला तरी, त्यात घट दिसून येते. 2023 मध्ये 0.51%, 2024 मध्ये 0.40% आणि 2025 मध्ये 0.10% परतावा मिळणे, हे याच कल दर्शवते.

गेल्या ‘मुहूर्त ट्रेडिंग’ पासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किती घसरण?

2025 च्या ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्रापासून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये 11% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या ‘मुहूर्त ट्रेडिंग’च्या वेळी सेन्सेक्स 84,426.34 अंकांवर बंद झाला होता, जो सुमारे 63 अंकांच्या वाढीसह होता. मात्र, 30 ऑक्टोबरपर्यंत सेन्सेक्स 74,459.53 अंकांवर आला म्हणजेच यात सुमारे 10,000 अंकांची किंवा 12% ची घसरण झाली. तर निफ्टी 2025 च्या ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्रात तो 25.45 अंकांच्या वाढीसह 25,868.60 अंकांवर बंद झाला होता. 30 ऑक्टोबर रोजी निफ्टी 23,053.10 अंकांवर होता.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

मुहूर्त ट्रेडिंग ही भारतीय शेअर बाजारातील एक दीर्घकालीन परंपरा आहे. दिवाळीच्या निमित्ताने, शेअर बाजार (एक्सचेंज) एक विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करतात, ज्याला गुंतवणूकदारांसाठी एक शुभ सुरुवात मानले जाते. ही परंपरा लक्ष्मीपूजनाशी जोडलेली आहे; अनेक गुंतवणूकदार दिवाळीच्या उत्सवाचा भाग म्हणून प्रतीकात्मक स्वरूपात शेअर्सची खरेदी करतात. या विशेष सत्रादरम्यान, गुंतवणूकदार ठराविक वेळेत आपले ऑर्डर्स देऊ शकतात आणि इक्विटी ट्रेडिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. असे सर्व व्यवहार एक्सचेंजचे लागू नियम आणि सेटलमेंट प्रक्रियेच्या अधीन असतात.

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 2026 चे वेळापत्रक

बीएसई (BSE) च्या परिपत्रकानुसार, ट्रेडिंग सदस्य दुपारी 1.15 ते 1.50 या वेळेत लॉग-इन करू शकतील. त्यानंतर दुपारी 1.50 ते 2.05 या वेळेत ‘ब्लॉक डील’ विंडो असेल. दुपारी 2.05  वाजता ‘प्री-ओपन’ सत्राची सुरुवात होईल, ज्यामध्ये दुपारी 2.10  वाजेपर्यंत ‘लिमिट’ (limit) आणि ‘मार्केट’ (market) अशा दोन्ही प्रकारचे ऑर्डर्स दिले जाऊ शकतील.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात बदल ; प्रसिद्ध कृष्णा बाहेर, स्टार गोलंदाजला संघात संधी –

दुपारी 2.10 ते 2.15  या दरम्यान केवळ ‘लिमिट’ ऑर्डर्स स्वीकारले जातील. ऑर्डर्स मॅचिंग आणि कन्फर्मेशनसाठी दुपारी 2.15 ते 2.17 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे, त्यानंतर दुपारी 2.20  पर्यंत बफर कालावधी असेल. एक्सचेंजने दुपारी 2.20 ते 3.30  या वेळेत ‘कंटिन्युअस ट्रेडिंग’ आयोजित केले आहे. या कालावधीत ‘क्लोजिंग-ऑक्शन’ (Closing Auction) प्रक्रिया देखील पार पडेल.

Exit mobile version