राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर

Nashik Kumbh Mela 2027 Schedule : बारा वर्षांनी भरणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे.

News Photo   2026 10 30T201757.437

Nashik Kumbh Mela 2027 Schedule

Nashik Kumbh Mela 2027 Schedule : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या (Nashik) सिंहस्थ कुंभमेळ्याची भाविकांना आता प्रतीक्षा लागली आहे. दर 12 वर्षांनी भरणाऱ्या या धार्मिक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, कुंभमेळ्याच्या प्रमुख कार्यक्रमांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. गंगा-गोदावरीच्या पवित्र संगमाशी जोडलेल्या या उत्सवाची सुरुवात 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे विविध धार्मिक विधी आणि अमृतस्नानाच्या माध्यमातून हा उत्सव पार पडणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी पंचवटीतील रामकुंड येथे ध्वजारोहण करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी कुशावर्त तीर्थ अर्थात रामतीर्थ येथे ध्वजस्तंभ पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.

आळंदीत साहित्य निष्ठांची मांदियाळी; या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उद्घाटन संपन्न

ध्वजारोहण सोहळ्यासाठी मान्यवरांनी निर्धारित वेळेच्या दोन तास आधी आसनस्थ होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यानंतर गोदा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं असून, सायंकाळी 6.30 वाजता आरती होणार आहे. या कार्यक्रमासाठीही उपस्थितांनी सायंकाळी 4.30 वाजण्यापूर्वी आसनस्थ व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या अमृतस्नानाच्या तारखांमध्ये 11 आणि 12 सप्टेंबर 2027 असा फरक आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेळापत्रक

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ

– 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी.
– ठिकाण – रामकुंड, पंचवटी.
नाशिक कुंभमेळा अमृतस्नानाच्या तारखा
– पहिले अमृतस्नान – 2 ऑगस्ट 2027.
– दुसरे अमृतस्नान – 31 ऑगस्ट 2027.
– तिसरे अमृतस्नान – 11 सप्टेंबर 2027.
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अमृतस्नानाच्या तारखा
– पहिले अमृतस्नान – 2 ऑगस्ट 2027.
– दुसरे अमृतस्नान – 31 ऑगस्ट 2027.
– तिसरे अमृतस्नान – 12 सप्टेंबर 2027.

ध्वज अवतरण

– सोमवार, 24 जुलै 2028 रोजी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी.

Exit mobile version