एनटीएकडून जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर, 12 उमेदवारांना 100 गुण

या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी ही आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

News Photo   2026 02 16T200916.786

एनटीएकडून जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर, 12 उमेदवारांना 100 गुण

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा 12 उमेदवारांना 100 गुण मिळाले आहे. याचाच अर्थ या सर्वांनी या परीक्षेत पहिला नंबर मिळवला आहे. (JEE) यात महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. त्यातबरोबर ही परीक्षा दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी 96.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

एनटीएने 21 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत जेईई मेन 2026 सत्र 1 ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. बीई आणि बी.टेक प्रोग्राम्समध्ये प्रवेश देणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण 13,55,293 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13,04,653 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात भारतातील सर्व उमेदवार तसेच काठमांडू, दुबई आणि कुवेत सारख्या परदेशी केंद्रांमधील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. एनटीएने सांगितले की एकूण उमेदवारांपैकी 96.26 % उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे १५वी भारतीय छात्र संसद, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांची माहिती

आणखी एक संधी मिळणार

जेईई मेन 2026 सत्र 1 परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये आणखी एक संधी मिळणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दोन्ही सत्रांमधील सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे ते सत्र 2 साठी नोंदणी करू शकतात. एप्रिलची परीक्षा 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी ही आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

निकाल कसा चेक करायचा?

निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
होमपेजवरील ताज्या JEE मेन 2026 सत्र 1 निकाल लिंकवर क्लिक करा.
वेब पेज उघडेल. तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
स्क्रीनवर निकाल दिसेल.

100 गुण मिळाले विद्यार्थी

श्रेयस मिश्रा – दिल्ली
नरेंद्र बाबू – आंध्र प्रदेश
शुभम कुमार – बिहार
कबीर छिल्लर – राजस्थान
चिरंजीब कार – राजस्थान
भावेश पात्रा – ओडिशा
अनय जैन – हरियाणा
अर्णव गौतम – राजस्थान
पासला मोहित – आंध्र प्रदेश
माधव विराडिया – महाराष्ट्र
पुरोहित निमय – गुजरात
विवान शरद माहेश्वरी – तेलंगणा

Exit mobile version