प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमात पालक मंत्री गिरीश महाजन (Mahajan) हे उपस्थितांना संबोधित करत होते. दरम्यान गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा भाषणात उल्लेख न केल्यानं वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं आक्षेप नोंदवला.’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही?’ असा जाब विचारत जोरदार गोंधळ घातला.
मंत्री गिरीश महाजन यांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही असं माधवी जाधव यांनी सांगितलंमंत्री गिरीश महाजन यांच्यावर एट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माधवी जाधव यांनी केली. माधवी जाधव यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीही ठामपणे उभी राहिली आहे. त्याचबरोबर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार असंही त्या म्हणाल्या आहेत.
नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांवर महिला पोलिक का भडकल्या?, नक्की काय घडलं?
मी माती काम करेन पण…
गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, असा दावा माधवी जाधव यांनी केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ‘जे संविधानाला कारणीभूत आहेत. त्यांनाच तुम्ही संपवायला निघाले आहात. वेळ आली तर मी वाळूच्या गाड्या उचलेन, मी माती काम करेन पण मी बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचं असेल तर करा,’ असा संताप माधवी जाधव यांनी व्यक्त केला.
