देशातील विरोधकांच्या आंदोलनांना विदेशातून (BJP) आर्थिक पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतरही विरोधकांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सक्षम होत असताना देशाला कमकुवत करण्यासाठी काही विदेशी शक्ती विरोधकांना हाताशी धरून आर्थिक मदत करत असल्याचा दावा विखे यांनी केला.
राहुल गांधी यांच्यावरही विखे पाटील यांनी निशाणा साधला. संसदेत चर्चा करायची नाही आणि बाहेर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे, असा राहुल गांधी यांचा तमाशा सुरू असल्याची टीका त्यांनी केली. विरोधकांच्या या भूमिकेला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. विदेशी पैशाच्या ताकदीवर विरोधकांकडून हे सर्व सुरू असल्याचा आरोपही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
