मृतदेहावरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण; डॉ. सेजल पवारला 15 दिवस सक्तीची रजा, KEMची चौकशी समिती स्थापन

आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डॉ. सेजल पवारवर KEM रुग्णालय प्रशासनाने प्राथमिक कारवाई करत तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

Untitled Design 87

Untitled Design 87

Sejal Pawar sent on 15 days’ compulsory leave : स्टॅन्डअप कॉमेडियन प्रणित मोरेंच्या कॉमेडी शोदरम्यान मृतदेहासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डॉ. सेजल पवार हिच्यावर KEM रुग्णालय प्रशासनाने प्राथमिक कारवाई करत तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या कालावधीत तिला महाविद्यालय परिसरात येण्यास तसेच वर्गांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने आज तिच्या पालकांशी चर्चा करून तिला त्यांच्या ताब्यात सोपवल्याची माहिती दिली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी कारण्यासाठी KEM प्रशासनाने पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समितीच्या अहवालनानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, सेजल पवार ही अद्याप वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असल्याने तिच्याशी संबंधित सर्व प्रक्रिया नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडल्या जातील. तसेच चौकशीदरम्यान तिला तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल.

आसाममध्ये भारतीय वायू दलाच्या AN-32 ला अपघात; विमानाचे दोन तुकडे, 5 जवान शहीद

दरम्यान, व्हिडिओमधील वक्तव्यांमुळे संस्थेच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामांचा देखील तपास समितीकडून केला जाणार आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, विद्यार्थिनीचे वर्तन, संस्थेची प्रतिमा आणि प्राप्त झालेल्या तक्रारी यांसह सर्व संबंधित मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी केली जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. प्राथमिक अहवालात काही आरोपांबाबत तथ्ये समोर आली असली, तरी सर्व बाबींची स्वतंत्र आणि सविस्तर चौकशी आवश्यक असल्याने विस्तृत समिती नेमण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

यापूर्वीही डॉ. सेजल पवार वादात सापडली होती. मागील वर्षी तिने इन्स्टाग्रामवरील एका रीलमध्ये KEM महाविद्यालयाचा उल्लेख चिंदी कॉलेज असा केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावेळी तिने लेखी माफी मागितल्यानंतर तिच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, प्रणित मोरेच्या शोमधील नव्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. आता चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यानुसार डॉ. सेजल पवारविरोधात पुढील शिस्तभंगात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version