शक्तीपीठ महामार्गासाठी 129 गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण; उर्वरित गावांमध्ये मोजणी प्रगतीपथावर

Shaktipeeth Expressway Land Survey; शक्तीपीठ महामार्गासाठी 13 जिल्ह्यांतील 409 गावांमध्ये संयुक्त जमीन मोजणी सुरू.

Shaktipeeth Expressway Land Survey

Shaktipeeth Expressway Land Survey

Shaktipeeth Expressway Land Survey: महाराष्ट्र राज्य शक्तीपीठ महामार्गाच्या आखणीतील 13 जिल्ह्यांमध्ये संयुक्त जमीन मोजणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 129 गावांमध्ये शंभर टक्के मोजणी शेतकऱ्यांनी महसूल यंत्रणेला दिलेल्या सहकार्यामुळे पूर्ण झाली आहे. पवनार (जि. वर्धा) ते (पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग) दरम्यान एकूण 856.765 कि. मी लांबीचा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत 8 मोठे निर्णय

राज्यातील 13 जिल्ह्यातून हा द्रुतगती मार्ग जात असून जिल्हाधिकारी प्रशासनाद्वारे 40 तालुक्यांतील 409 गावांमध्ये संयुक्त मोजणी प्रगतीपथावर आहे. राज्यातल्या 409 पैकी 129 गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे तर 15 गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया अंशत: झाली आहे. उर्वरित 265 गावांमध्ये संयुक्त मोजणी संदर्भात शेतकऱ्यांबरोबर संवाद प्रक्रिया सुरू आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग धार्मिक, पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. भूसंपादन प्रक्रियेत संयुक्त जमीन मोजणी ही महत्त्वाची पायरी असून जिल्हाधिकारी यंत्रणा त्याची अंमलबजावणी करत आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्येनंतर ठाण्यात राडा; संजय राऊत अन् आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात दाखल

856.765 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या सुधारित आराखड्याची अधिसूचना 5 मे 2026 रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केली. त्या सुधारित आराखड्यानुसार संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त मोजणी प्रगतीपथावर आहे.

कुठे झाली संयुक्त मोजणी?

विदर्भात वर्धा जिल्ह्यातील दोन तालुक्यांमधील 20 गावांमध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 70 गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया झाली आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात एका तालुक्यातील 11 गावांमध्ये तर हिंगोलीतल्या तीन तालुक्यांतील 40 गावांमध्ये, परभणीतल्या दोन तालुक्यांतील सहा गावांत तसेच बीडच्या दोन तालुक्यांतील आठ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. लातूरच्या तीन तालुक्यांतील चार गावांची संयुक्त मोजणी झाली आहे आणि आठ गावांची संयुक्त मोजणी अंशत: झाली आहे. धाराशिवच्या एका तालुक्यातील आठ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून पाच गावांतील संयुक्त मोजणी अंशत: झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोजणी संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद प्रक्रिया सुरू आहे.

अशोक खरात प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश, आरोपींच्या वकिलांना व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी

संयुक्त जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी महामंडळाची यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी स्तरावरून संवादाची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत जनजागृती आणि संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘शक्तीपीठ संवाद यात्रेचा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यात झाला होता. याशिवाय, संयुक्त जमीन मोजणी बाबत जिल्हाधिकारी प्रशासन, महसूल यंत्रणा व महामंडळात समन्वय राहण्यासाठी पुण्यातील ‘यशदा’ येथे कार्यशाळा संपन्न झाली होती.

Exit mobile version