भाजपने माझी शक्ती कमी केली अन् काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना दिली, चंद्रपुर निकालानंतर मुनगंटीवारांच फडणवीसांकडं बोट

चंद्रपुरातील 11 पैकी 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर, भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.

News Photo   2025 12 21T215658.988

भाजपने माझी शक्ती कमी केली अन् काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना दिली, चंद्रपुरच्या निकालानंतर मुनगंटीवारांचा रोख थेट फडणवीसांकडं

राज्यभरातील नगरपरीषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज आले आहेत. (Election) यामध्ये महायुतीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे तर शिवसेना शिंदे गट दोन नंबरवर आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधील कार्यकर्ता ते नेता रोज पक्षांतर करत असताना चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने लक्षवेधक यश मिळवलं आहे.

चंद्रपुरातील 11 पैकी 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर, भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली असं वक्तव्य करत मुनगंटीवारांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे.

 स्टिंग ऑपरेशन अन् सख्ख्या भावाशी वैर; आमदार निलेश राणेंचं मालवणचे किंग

चायतींपैकी 55 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंड म्हणजे नागपुरमध्ये 27 पैकी 22 नगरपालिकेवर भाजपनं झेंडा फडकवला आहे. मात्र, चंद्रपूरमध्ये भाजपला केवळ दोनच ठिकाणी विजय मिळवता आला आहे. त्यानंतर मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

चंद्रपुरमध्ये झालेल्या पराभवावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आम्ही हा पराभव नम्रतापूर्वक स्वीकारतो. विजय झाल्यावर माजायचं नाही, पराभव झाल्यावर लाजायचं नाही. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. चंद्रपूरमध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण व्हावं असं आमच्या पक्षाचं धोरण दिसतं. त्यातून मग 11 नगरपालिकांमध्ये गटबाजी अनुभवली आहे असंही ते म्हणाले.

त्याचबरोबर शनिशिंगणापुरनंतर आमचा एकमेव पक्ष आहे ज्याचे दरवाजे इतरांसाठी कायम खुले असतात, त्यामुळे कुणीही पक्षात येतो, त्यामुळे अशी वेळ येऊ शकते असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला आहे . दरम्यान, फडणवीस म्हणाले होते की, सुधीरभाऊ कुठं कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ आणि चंद्रपुरची महापालिका जिंकू. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर बोलताना, म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये अंतर आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

कुठ कुठ विजय झाला?

जिल्ह्यातील १० पैकी बल्लारपुर, ब्रम्हपुरी, राजुरा, वरोरा, नागभीड, मूल व घुग्घुस या नगर पालिकांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला, तर चिमूर येथे भाजपा, भद्रावतीत शिंदे शिवसेना आणि गडचांदूर येथे अपक्ष नगराध्यक्ष विजयी झाला आहे. भिसी या एकमेव नगर पंचायतीत भाजपा नगराध्यक्ष निवडून आला. दहाही पालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

Exit mobile version