बँक ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या रविवार असूनही बँका सुरू; सोमवारपासून 3 दिवसांचा संप, आजच उरकून घ्या बँकेची कामं

Sunday Bank Opening ; 28 सप्टेंबरपासून तीन दिवसांचा बँक संप होणार असून, त्याआधी 27 सप्टेंबरला रविवारीही बँका सुरू राहणार आहेत.

Sunday Bank Opening Ahead of Three-Day Bank Strike

Sunday Bank Opening Ahead of Three-Day Bank Strike

Sunday Bank Opening Ahead of Three-Day Bank Strike from September 28: बँकेशी संबंधित कामं असतील तर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कर्मचारी 28 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. हा संप 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे बँकेची कामं रखडू नयेत म्हणून संप सुरू होण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच रविवार 27 सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SIR वरून वाद पेटला, भाजप नेत्याचा ज्ञानेश कुमारांना खुला पाठिंबा; थेट पद्मभूषण देण्याची मागणी

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांकडून पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासह कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजीही बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप केला होता.

रविवारी बँका किती वाजता सुरू राहणार?

संपामुळे ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी 27 सप्टेंबरचा रविवार कामकाजासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयच्या मंजुरीनंतर बँकांच्या शाखा, कार्यालये, एटीएमशी संबंधित शाखा आणि करन्सी चेस्ट सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ग्राहकांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत बँकेशी संबंधित कामं करता येणार आहेत.

देशातील गद्दारांना पहिला बूट मीच फेकून मारेन; ज्ञानेश कुमारांवर संजय राऊतांचा घणाघात

म्हणजेच, सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाआधीच ग्राहकांना आपली महत्त्वाची बँकिंग कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी अतिरिक्त दिवस मिळणार आहे. मात्र, शाखेनुसार प्रत्यक्ष कामकाजाच्या वेळेत फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या संबंधित बँकेकडून आलेली सूचना तपासणे योग्य ठरेल.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आधीच देण्याचे निर्देश

बँक संपाचा परिणाम पगार आणि पेन्शनच्या व्यवहारांवर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारनेही आधीच तयारी केली आहे. 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान संप होणार असल्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, पगार आणि निवृत्तीवेतन 25 सप्टेंबरलाच वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

SBIसह इतर बँकांकडून ग्राहकांना सूचना

संपाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), बँक ऑफ बडोदा (BOB) आणि युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) यांसारख्या बँकांकडून ग्राहकांना रविवारच्या कामकाजाची माहिती दिली जात आहे. सोशल मीडिया, ई-मेल आणि मोबाईल मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांना शाखा सुरू राहणार असल्याची माहिती पोहोचवली जात आहे.

एन्काउंटर झालं तर देश जागा होईल! लेह हिंसाचाराच्या वर्षपूर्तीनिमित्त सोनम वांगचुक आक्रमक

त्यामुळे 28 ते 30 सप्टेंबरच्या संपामुळे बँकेची महत्त्वाची कामं अडकण्याची शक्यता असेल, तर ग्राहकांना रविवारच्या अतिरिक्त कामकाजाच्या दिवशी ती पूर्ण करता येणार आहेत.

Exit mobile version