Supreme Court Property Dispute: सर्वाच्च न्यायालयातील एका खटल्याची चांगलीच चर्चा होत आहे. कारण मालमत्तेच्या एका वादात न्यायमुर्तींनी एका मुलाला आपल्या आईचे काय महत्व असते, याची आठवन करुन दिली. उलट मुलाला आईचे पाय धरून माफी मागण्याचा सल्ला दिला.
गौतमी ते राधा… महाराष्ट्रात ‘या’ स्टेज डान्सर्सची तुफान क्रेझ!
झालं असं की, आई आणि वडिलांनी आपल्या मुलाला आणि सुनेला कोणतेही भाडे न आकारता घरात राहू दिले. पण मुलगा आणि सुनेने त्यांना छळायला सुरुवात केली, बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता आणि घर आपल्या नावावर करुन घेण्यासाठी दबाव आणला. हे प्रकरण कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात गेल्यावर पालकांच्या बाजूने निकाल देण्यात आला. म्हणून मुलाने सर्वोच्च न्यायालय गाठले.
Radha Patil : साडी नेसल्यावर ब्लाऊज, कंबर दिसणारच…गुन्हा दाखल होताच राधा पाटील भडकली!
तर तेथे न्यायमुर्ती सतिश चंद्र शर्मा (Satish Chandra Sharma) आणि न्यायमुर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपिठाने पालकांच्याच बाजूने निकाल दिला. न्यायमुर्ती शर्मांनी मुलाला चांगलेच सुनवाले. “तू जाऊन तुझ्या आईचे पाय धरले पाहीजे आणि तिची माफी मागितली पाहीजेस. जा तुझ्या सर्व पापांबद्दल तिची क्षमा माग”. मुलाच्या वकिलालाही न्यायमुर्तींनी सल्ला दिला. “मुलगा जे करत आहे ते चुकीचे आहे. आम्ही त्याला सांगत आहोत की त्याने आईकडे परत जाऊन तिचे पाय धरुन माफी मागावी, तिने केलेल्या उपकारांची जाणीव ठेवावी आणि तिचा आशिर्वाद घ्यावा”.
ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
कनिष्ठ न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, पालक हेच मालमत्तेचे एकमेव मालक आहेत आणि मुलगा व सून हे केवळ परवानाधारक होते, ज्यांचा परवाना कायदेशीररित्या रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे, मालमत्तेचा ताबा सोडणे त्यांना बंधनकारक आहे. 17 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाविरुद्ध मुलाने ‘विशेष रजा याचिका’ दाखल केली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने 17 एप्रिल रोजीचा निकाल कायम ठेवला आणि मुलाची याचिका आता फेटाळून लावली.
