लंडन-अमेरिका इतकंच आवडत असेल तर देश सोडून तिथे जा; तनिषा मुखर्जीच्या पोस्टची जोरदार चर्चा

अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिनं सोशल मीडियावरील पोस्टमधून देशाला कमी लेखणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. तिनं सल्लाही दिला आहे.

News Photo   2026 10 11T211423.658

Tanisha Mukerji Statement

Tanisha Mukerji Statement : काजोलची बहीण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जी (India) हिनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिची ही पोस्ट समोर आली आहे. काही लोक डोळ्यांवर पट्टी बांधून आपली मतं मांडत असल्याचा आरोप तनिषानं केला आहे. मात्र, आपल्या पोस्टमध्ये तिनं सुरू असलेल्या आंदोलनाचा थेट उल्लेख केलेला नाही.

तनिषानं पोस्टमध्ये काही उच्चवर्गीय आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या हिंदूंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. अशा काही लोकांवर ब्रिटिश मानसिकतेचा प्रभाव असल्याचं म्हणत, त्यांना लंडन आणि अमेरिकेबद्दल इतकंच आकर्षण असेल, तर त्यांनी तिथे जावं, अशी भूमिका तिनं मांडली. देशात अनेक समस्या आहेत, हे मान्य करतानाच बदल घडण्यासाठी वेळ द्यावा लागतो, असंही तिनं नमूद केलं. गेल्या १० वर्षांत देशानं केलेल्या प्रगतीकडे पाहण्याचं आवाहनही तिनं केलं.

आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या! नाहीतर; एमपीएससी आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

सरकारला पाठिंबा दिला की काही जणांना अंधभक्त किंवा अशिक्षित ठरवलं जातं, तर अमेरिका आणि जर्मनीतील देशाला नुकसान पोहोचवू शकणाऱ्या गटांना पाठिंबा देणाऱ्यांना कूल समजलं जातं, असं तनिषानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. लोकांच्या विचारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत तिनं माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन स्वतःची सारासार बुद्धी गमावू नये, असं आवाहन केलं. कायद्याच्या राज्यावर चालणारा समाजच नागरिकांना सुरक्षित ठेवू शकतो, असा मुद्दाही तिनं मांडला.

तनिषा मुखर्जी ही अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आणि काजोलची बहीण आहे. तिनं २००३ मध्ये ‘श्श्श्श…’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘सरकार’, ‘नील अँड निक्की’ आणि तमिळ चित्रपट ‘उन्नाले उन्नाले’मध्ये ती दिसली. ‘बिग बॉस ७’मध्ये पहिली उपविजेती ठरल्यानंतर तिला अधिक लोकप्रियता मिळाली. पुढे ‘खतरों के खिलाडी ७’ आणि ‘झलक दिखला जा ११’ या कार्यक्रमांतही तिनं सहभाग घेतला, तर ‘गँग्स ऑफ हसीपूर’मध्ये परीक्षक म्हणून काम केलं. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

Exit mobile version