माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह नांदेडमधील चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून एकजणाला अटक

Ashok Chavan Death Threat : अशोक चव्हाणांसह नांदेडमधील चार आमदारांना धमकी देत व्यापाऱ्याकडे खंडणी मागणारा आरोपी मुंबईतून अटकेत.

News Photo   2026 11 18T214724.347

Ashok Chavan Death Threat

Ashok Chavan Death Threat : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे (वय 39) याला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केली. या प्रकरणामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आरोपीच्या धमकीच्या ऑडिओ क्लिपचीही चर्चा सुरू झाली आहे.

नांदेडमधील व्यावसायिक महेश कृष्णाजी तुतारे यांना 14 नोव्हेंबर रोजी आरोपी रवी रोकडे याने फोन केला होता. या संभाषणात त्याने एक लाख रुपयांची मागणी केली. व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने अशोक चव्हाण आणि नांदेडमधील चार आमदारांना तीन वर्षांपूर्वी कोरेगाव येथे एकाच दिवशी संपवण्याची योजना आखल्याचा दावा केला. तसेच, आपल्या पाठीशी मोठ्या लोकांचा हात असल्याचे सांगत त्याने व्यापाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर तुतारे यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई! 15 लाखांचे बक्षीस असलेला 22 वर्षीय दहशतवादी कमांडर लतीफ भट ठार

या प्रकरणाचा तपास करताना नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा माग काढला आणि मुंबईतून त्याला ताब्यात घेतले. सध्या पोलीस या प्रकरणातील धमकी, खंडणीची मागणी आणि आरोपीने केलेल्या दाव्यांची चौकशी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात आपल्यासह नांदेडमधील चार आमदारांना मारण्याचा कट आखल्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून, पोलिसांची चौकशी सुरू असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काय आहे ऑडिओ क्लिपमधील संवाद ?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि तुमच्या नांदेड मधील चार आमदार एकाच दिवशीच उडवायचा कारेगावमध्ये मी प्लॅन केला होता.
मी सध्या प्रॉब्लेममध्ये आलो आहे, नाहीतर मला तुमचे एक लाख रुपये काही महत्त्वाचे नाहीत,
माझ्या पाठीमागे हात भरपूर मोठे आहेत
पण मी एकाही जणाला कॉन्टॅक्ट करत नाही, कारण माझा जुना नंबर बंद पडलाय
ते नंबर काढायला मला फेसबुकला रिटर्न जावं लागते
मागच्या सहा महिन्यात मी तुम्हाला एकदाही आरे कारे शब्द केला नाहीये
महेशभाऊ म्हणूनच मी तुम्हाला बोलतोय
खैरे काकाला सुद्धा मी महेश या नावाने तुमचा उल्लेख केलाय
खैरे काका सोडून द्या, तुम्ही सुशांत भाऊला विचारा, मी एक ही रॉंग मेसेज केलेला नाही
तुम्ही जे म्हणले ते भावाचं,भावाच म्हणल्यावर मी एवढा दम ठेवतो,तुमचा अख्खा नांदेड जिल्हा जरी माझ्या वाकड्यामध्ये घुसला ना तरीपण माझं काहीच बिघडू शकत नाही
एवढं तुम्हाला मी गॅरंटीन सांगतो बघा, एवढा वाकडा आहे मी
राहिला प्रश्न फक्त एक लाखाचा, ते एक लाख जर तुम्हाला नसेल द्यायचे तर मला काही अडचण नाही
पण लाईफमध्ये तुम्ही लक्षात ठेवा की रवी रोकडे नावाचा कोणतरी एक माणूस होता
माझा नांदेडशी काही एक संबंध नाहीये, माझी बायको नांदेडची आहे, मी उद्या बायको सोडून देतो,मला काही घेणं देणं नाही
प्रश्न भावाचा आला ना तर मी तुम्हाला सांगतो ना महेश भाऊ, मला ताकत लावायची गरज नाहीए

Exit mobile version