Traffic on Mumbai-Pune highways smooth succeeds removing gas tanker after 32 hours : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या 32 तासांपासून वाहनांच्या (Trafic) रांगाच रांगा लागल्या असून प्रवासी चांगलेच ताटकळले आहेत. महामार्गावरील बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना प्रचंड अशा नरक यातना सोसाव्या लागल्या. त्यानंतर अखेर 32 तासांनंतर हा गॅस टँकर हटवण्यात यश आलं आणि वाहनचालक आणि प्रवाशांची सूटका झाली.
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोडी मोकळी होणार, टोल घेऊ नका, डीसीएम शिंदेंचे आदेश
या टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याचे शक्यता होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था करत ठेवण्यात आली होती. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलिस, एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, ओएनजीसी यामधील पथक होते. तसेच सीआयएसएफचे जवान स्थानिक स्वयंसेवक या सर्व यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करत संभाव्य धोका टाळात आणि 32 तासानंतर ही वाहतूक कोंडी फुटली.
पॉवर-पॅक्ड नव्या पोस्टरसह ‘पेड्डी’ची रिलीज डेट जाहीर, राम चरणचा दमदार अवतार समोर
दरम्यान मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओडिसी बोगद्याजवळ हा ज्वलनशील गॅसचा टँकर पलटी झाला होता. मात्र या घटनेची प्रशासनाने कोणतीही खबरदारी न घेता सूचना दिल्या नव्हत्या. याचा फटका बुधवारी पहाटे मुंबईच्या दिशेने निघालेला प्रवाशांना बसला. दिवसभर त्यांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून बसावं लागलं. या अपघातामुळे तब्बल 25 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या प्रवासा मध्ये रुग्ण, जेष्ठ नागरिक, लहान मुलं, महिला आणि पुरुष या सर्वांनाच हाल आपेष्ट सहन कराव्या लागल्या.
टोल घेऊ नका, डीसीएम शिंदेंचे आदेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेतली. या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी आणि पोलिसांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
