वाहनचालकांसाठी महत्त्वाचे! सावधान रहा, अन्यथा तुम्हाला 10 हजारांचा फटका बसलाच समजा…

New Motor Vehicle Fines 2025 Traffic Rules : नवीन मोटार वाहन दंड 2025 नुसार, वाहतूक नियमांचे (Traffic Rules) पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते. तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो, तुम्हाला सामुदायिक सेवा देखील करावी लागू शकते. आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले (New Motor Vehicle Fines 2025) नाहीत तर तुम्हाला तीन नव्हे तर दहा पट दंड भरावा लागेल. कारण नवीन मोटार वाहन दंड 2025 हा 1 मार्च 2025 पासून लागू झाला आहे. दंडाव्यतिरिक्त, तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद आहे.
1. हेल्मेट – जर तुम्ही हेल्मेट न घालता रस्त्यावर दुचाकी चालवताना आढळला, तर थेट 1 हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. सोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केलं जाणार आहे. यापूर्वी अशा चुकीसाठी शंभर रूपये (traffic violations) दंड आकारला जात होता. तसेच जर कोणी दुचाकीवर तिघेजण प्रवास करत असाल तर 1 हजार रूपये दंड द्यावा लागणार आहे.
2. सीट बेल्ट – सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. यापूर्वी यासाठी 100 रुपयांची तरतूद होती. तुम्ही जर सिग्नल मोडला तर तु्म्हाला आता 500 रूपयांऐवजी 5 हजार रूपये दंड भरावा लागणार आहे.
परबांना समज अन्, टांगा पलटीचा उल्लेख ; आक्रमक झालेल्या शिंदेंनी बाहेर काढला ठाकरेंचा माफीनामा
3. मोबाईलवर बोलणे – जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असाल तर तुमच्याकडून पुढील दीड वर्षाच्या रिचार्जच्या रकमेइतका दंड वसूल केला जाईल. यासाठी देखील आता 500 रूपयांऐवजी 5000 रूपये दंड वसूल केला जाणार आहे.
4. वेगात वाहन चालवणे – रस्त्यावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्याबद्दल 5 हजार रुपये दंड आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायकपणे वाहन चालविल्याबद्दल 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
5. दारू पिऊन गाडी चालवणे – दारू पिऊन गाडी चालवत असेल तर 10,000 रुपये दंड किंवा 6 महिने कारावासाची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास, 15,000 रुपयांपर्यंत दंड किंवा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
6. रस्ता अडवला तर – जर कोणी रुग्णवाहिका सारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.
नगर हादरले! दहा कोटींसाठी व्यापाऱ्याचा खून; निलंबित पोलिसासह एकाला बेड्या
7. कागदपत्रे – जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर 500 रुपयांऐवजी 5000 रुपये देण्यास तयार रहा. जर तुम्ही विम्याशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला 2000 रुपये दंड किंवा तीन महिन्यांची तुरुंगवास होऊ शकतो. तुम्हाला सामुदायिक सेवा देखील करावी लागू शकते, जसे की काही दिवस ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहून पोलिसांना मदत करणे. जर तुमच्याकडे प्रदूषण प्रमाणपत्र नसेल तर 10 हजार रुपये देण्यास तयार रहा. एवढेच नाही तर 6 महिने तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेचीही तरतूद करण्यात आली आहे. तथापि, खिशात कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही. ते मोबाईलवर असले तरी चालेल.
8. मुले आणि वाहने – जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल आणि गाडी चालवताना आढळलात तर तुम्हाला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड होऊ शकतो. यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील 1 वर्षासाठी रद्द केली जाईल. वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही.