धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली; तब्बल 55 प्रवाशांचा मृत्यू

धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली; तब्बल 55 प्रवाशांचा मृत्यू

Guatemala Bus Accident : जगभरात रस्ते अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आता असाच भीषण अपघात मध्य अमेरिकेत घडला आहे. ग्वाटेमालात प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली. या अपघात तब्बल 55 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काही प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाचे प्रवक्ते म्यनोर रुआनो यांनी सांगितले की येथे ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. ग्वाटेमालात हा अपघात आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका गजबजलेल्या रस्त्यावरून प्रवासी बस चालली होती. परंतु, एका पुलावर असताना ही बस अचानक खाली कोसळली. या अपघाताचे काही फोटो अग्निशमन विभागाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात बस पाण्याच बुडाल्याचे दिसत आहे.

नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात; भाविकांची बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू

ग्वाटेमाला सिटीचे महापौर रिकार्डो क्विनोनेज यांनी सांगितले की आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहेत. ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष बर्नार्डो अरेवलो यांनी देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित केला आहे. या भागात आपत्कालीन यंत्रणा आणि सैन्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 51 पेक्षा जास्त मृतदेह काढण्यात आले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांत 36 पुरुष आणि 15 महिला आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

कसा घडला अपघात

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले होते. पुलावरून खाली कोसळण्याआधी बसची काही वाहनांना धडक बसली होती. त्यानंतर एक मेटलची रेलिंग तोडून बस जवळपास 20 मीटर (65 फूट) खोल दरीत कोसळली. ही बस सॅन अगस्टीन अकासागुस्तलान शहरातून ग्वाटेमाला सिटीकडे निघाली होती. बस तीस वर्षे जुनी होती. परंतु, बस चालवण्याचा परवाना होता.

मध्य आणि दक्षिण अमेरिकेत सातत्याने अपघात होत असतात. जानेवारी 2018 मध्ये पेरूत एक बस मोठ्या डोंगराला धडकून झालेल्या अपघातात 52 लोकांचा मृत्यू झाला होता. याआधी मार्च 2015 मध्ये सांता कॅटरिनामध्ये झालेल्या अपघातात 54 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात; भाविकांची बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू

follow us
  • fb
  • instagram
  • youtube