तुकाराम मुंढेंची राजस्थानमध्ये बदली? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; तुकाराम मुंढे म्हणाले…

Tukaram Mundhe तुकाराम मुंढेंची राजस्थानमध्ये बदली झाली, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. त्यावर तुकाराम मुंढेंनी स्पष्टीकरण दिले.

Tukaram Mundhe's Rajasthan transfer

Tukaram Mundhe's Rajasthan transfer

Tukaram Mundhe’s Rajasthan transfer viral Post : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी राज्यातील भेसळयुक्त खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या कारवाईंवर सामान्य नागरिक खुश आहेत. कालच त्यांनी सुट्टे खाद्यतेल विक्रिवर बंदी  लावली (Ban on Loose Edible Oil) आहे. असे सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहेत. तर अशातच तुकाराम मुंढेंच्या बदलीचा एक मॅसेज, पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातून थेट राजस्थानमध्ये बदली झाल्याचा दावा करणारा हा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऑनलाइन शिवीगाळ प्रकरण, मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल

या व्हायरल पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांची ही 26 वी बदली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये बदली झाल्याच्या चर्चेला त्यांनी थेट फेटाळून लावले आहे.

Sugar Price Hike : साखरेचे भाव कमी होणार, सरकार अ‍ॅक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“माझी बदली राजस्थानला कशी होईल? मी महाराष्ट्र कॅडरचा अधिकारी आहे. माझी बदली झाली तर ती महाराष्ट्रातच होऊ शकते. माझा राजस्थानशी काहीच संबंध नाही,” असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नुकताच राज्यात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्या बदलीची पोस्ट व्हायरल झाल्याने नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

Pakistani Sugar : पाकिस्तानकडून साखर खरेदी? पाकिस्तानी कारखानदारांची सरकारकडे मोठी मागणी

मात्र, राजस्थानला बदली झाल्याचा दावा खोटा असल्याचे तुकाराम मुंढे यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version