छत्रपती संभाजीनगरमधील ही सभा ऐतिहासिक आहे. (Election) कितीही गद्दार गेले असले तरी माध्यासोबत निष्टावंताची फौज आहे. अंबादास दानवे यांनी विरोधकांना ग्रांऊंडवर सभा घेण्याचं जे आव्हान दिलय ते पेलू शकणार नाहीत. कारण, या सभेला निष्ठावंत आहेत गद्दार नाहीत अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हेही उपस्थित होते.
ज्या हक्काने बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरावर प्रेम केलं त्या शिवसेनेचा पराभव बाळासाहेबांना जिव्हारी लागला असेल आणि मलाही लागला अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त करत भावनीक आवाहनही केलं. तसंच, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोध करणारे सारे जण आमच्या ताटात जेऊन गेले आहेत, अशी टीका केली होती. या संदर्भाने त्यांनी ही टीका केली. निवडणुकीपूर्वी फोन पे वरुन जर पैसे दिले जात असतील. विरोधी पक्षाकडून कोणी उभेच राहू नये असे प्रयत्न केले जात आहे. विरोधी पक्षावर ईडी, आयकर वर छापे टाकत आहेत. अशा स्थितीमध्ये निवडणुका घेतल्या जात असताना सत्ताधाऱ्यांना आव्हान देत आहे.
सत्ताधाऱ्यांना महापालिकेत दिलेले आव्हान पेलणार नाही. त्यांच्याकडे सत्तेचे मस्ती आहे. ज्यांना दिले त्यांनी खाल्ले, माजले. ते गेले आता नवी सुरुवात करू. १९८८ मध्ये जशी सुरू केली तशीच सुरुवात करू. काही नवे चेहरे मिळाले आहेत. पैशांच्या मस्तीने निवडणूक फिरवली जाणार असेल त्याला कोणी भीक घालणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. ही अस्तित्वाची नाही तर तुमच्या जगण्याची ही लढाई आहे.
भाजप विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता. राष्ट्रप्रथम हे सांगणारे भाजप आता मेली आहे. बलात्कार, खूनी चालतात. गुंड प्रथम, भ्रष्टाचारी प्रथम, अशी त्यांची अवस्था आहे. आता त्यांना विचारा कोठे नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्र माझा, असा सवालही ठाकरे यांनी केला. प्यायला पाणी मिळत नाही पण दारुचे परवाने पटापट मिळत आहेत. कारण सत्ताधारी मंडळी खोटारडी आहेत असेही ते म्हणाले.
दंगल होऊ न दिल्याने औद्योगिक विकास
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील यांची समयोचित भाषणे झाली. सभेस मिलिंद नार्वेकर, शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात आहे. एमआयएम बरोबर मैत्री करता. १९८८ पासून दंगल होऊ दिली नाही. शांतता राखली गेली त्यामुळे औद्योगिक वाढ झाली. त्याचे श्रेय शिवसेनेचे असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. खासदारांना मराठी वाचता येत नाही. त्यांनी फक्त दारुची दुकाने उघडली, अशी टीका खैरे यांनी केली.
अंबादास दानवे यांची टीका
ते आपल्या मुलीचा आणि मुलाचा करतात. बाकी काही करत नाहीत, अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांचे नाव न घेता या वेळी करण्यात आली. केली. या निवडणुकीमध्ये शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत आणि मुलगी हर्षदा निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी अडीच हजार कोटी रुपये मंजूर केले होते. १६८० कोटी रुपयांची योजना ठाकरे यांनी मंजूर केली होती. कंत्राटदार काम करण्यास तयार नव्हते. पण त्याला काम करायला लावले. २०२२ ला १० किलोमीटरचे काम बाकी होते. खोट्या घोषणा केल्या जातात. शहराला नऊ दिवसाला एकदा पाणी मिळते. शिवसेनेत असताना दोन दिवसाला पाणी देत होतो. २३ रस्त्याला १५२ कोटी रुपये दिले होते. चार वर्षात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पूर्ण होऊ शकले नाही. सफारी पार्कची मंजुरी ठाकरे यांनी दिली होती. सत्ताधाऱ्यांनी ‘सुपर संभाजीनगर’ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला आहे.
घोटाळयाची महापालिका
स्कूल ऑफ आर्किटेक्चर नागपूरला पळवले. पाणी पुरवठा योजना २७६० कोटी रुपयांवर गेली. १०५० कोटी कोणाच्या खिशात जाणार आहात. मुख्यमंत्री खोटे बोलत आहे. ८३२ कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेला घ्यावे लागणार. हप्ता फेडायला महापालिकेकडे पैसे राहणार नाही.
शहरात फक्त ४४ दिवस शहराला पाणी मिळाले आहे. ५३ जलकुंभा पैकी फक्त ९ जलकुभ झाले. ४६०० कोटी रुपयाच्या घोटाळयात स्थानिक खासदारांचे नाव होते. इडीची चौकशी आता बंद झाली आहे. संजय शिरसाट यांनी एमआयडीचे भूखंड स्वत: च्या कंपनीला घेतला. खासदारांच्या वाहनचालक २५० कोटीची जमीन घेतली. त्याला अटक झाली. जावेद शेख या वाहन चालकाला बळीचा बकरा बनवला आहे अशी टीका शिवसेना नेते अंबदास दानवे यांनी केले.
