Sanjay Gaikwad On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा नाकारली म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी केला आहे. सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता संजय गायकवाडांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून गेली आहे. या आरोपांमुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
टवाळखोरांनी वाघनखांवरच प्रश्न उपस्थित केला; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
संजय गायकवाड म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना उसकावण्याच प्रयत्न करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद दिलं तर ते जाणार नाहीत, असं म्हणण्यात आलं कारण एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीच पालकमंत्रीपद घ्यावं, तिकडे जावं आणि मरावं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली होती.
Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण
नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांनी मारण्याचा कट रचला होता., असं असताना त्यांनी झेड प्लस सुरक्षेची मागणी करण्यात आली होती, मात्र, मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा देऊ नका असं शंभूराज देसाई यांना सांगितलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय सिंह यांना झटका, ईडीच्या कोठडीत वाढ
आरोपांना शंभूराज देसाईंनीही दिला दुजोरा :
एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भात गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी एकदा बैठक सुरू असताना मातोश्रीवरून फोन आला. एकनाथ शिंदेंची सुरक्षा वाढवू नका, असं सांगितलं गेलं.
संजय राऊतांच्या गळ्यात कोणाचा पट्टा?
संजय राऊतच्या गळ्यात किती पक्षांचा पट्टा आहे? एका पक्षाचा पट्टाच गळ्यात ठेवावा. काहीही झालं तरी सरकारलाचा जबाबदार धरतायं असं विनाकारण का बदनाम करीत आहे. मंत्री शासन असतं, प्रशासनातील नालायक अधिकाऱ्यांमुळे नांदेड घाटी रुग्णालयासारख्या घटना घडतात, आणि विरोधक मंत्र्यांवर आरोप करतात.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना आम्ही हात देऊन मोठं केलं पण त्यांनी आमचेच हात कापले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना संजय गायकवाड यांनी हे आरोप केले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंनी अनेकांना पक्षातून बाहेर काढलं, त्यामध्ये राज ठाकरे, नारायण राणे, नाईक, रामदास कदम असे अनेक असल्याचंही ते म्हणाले आहेत.