राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चाना उधाण आले आहे. शरद पवार गटाकडुन विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या जात असताना अजित पवार गटातील नेत्यांकडुन मात्र अजितदादांच्या भूमिकेचा दाखला देत विलिनीकरणाचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम कायम आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यानी या प्रकरणावर भाष्य करत विलिनीकरणाच्या चर्चेत काही प्रमाणात तथ्य असल्याचा दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार यानी माध्यमाशी बोलताना विलिनीकरणाच्या प्रक्रियेबाबत काही गोष्टी पडद्यामागे निश्चित झाल्या असल्याचे संकेत दिले. पवार साहेब थकले आहेत आणि त्याची प्रकृतीही ठीक नाही. दुसरीकडे कोणाला मंत्रिपद मिळणार, कोण केंद्रात मंत्री होणार आणि दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण कधी होणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये काही प्रमाणात सत्य असले तरी आमच्याकडे याबाबत ठोस पुरावे नाहीत. तसेच संबंधितांकडुन या चर्चाचे स्पष्ट खंडनही होताना दिसत नाही, असे वडेट्टीवार यानी म्हटले.
राष्ट्रवादीच्या नेत्यानी नेमकी कोणती भूमिका घेणार, हे स्पष्ट करावे. ते पुरोगामी विचारासोबत राहणार की जातीवादी आणि धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणार, याच्याशी आमचा संबंध नाही. मात्र, अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील जनता संबंधिताना त्याची जागा दाखवेल. या संपूर्ण घडामोडीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले असून, अखेर कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, असेही वडेट्टीवार यानी स्पष्ट केले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाशी काँग्रेसचा काहीही संबंध नसल्याचे सांगत वडेट्टीवार यानी सत्तेसाठी काही नेत्यांची सुरू असलेली धडपडही अधोरेखित केली. काही लोकाना सत्तेशिवाय राहणे शक्य होत नाही. सत्तेत जाण्याची त्याची मानसिकता असून, त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मात्र, सत्तेसाठी घेतलेला असा निर्णय हा महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मताचा अनादर ठरेल. ज्या पक्षाच्या विरोधात जनतेने मतदान केले, त्याच पक्षासोबत जाऊन सत्तेत सहभागी होणे म्हणजे मतदाराशी बेइमानी करण्यासारखे आहे, अशी टीका त्यानी केली.
विलिनकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती पण…, विलीनीकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार गटातील काही नेते भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोपही वडेट्टीवार यानी केला. भाजपच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या या नेत्याना जे मिळेल त्यावर समाधान मानावे लागत आहे. अशा लोकाना स्वतःच्या राजकीय चुका झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची साथ हवी आहे. काही नेत्यांची सत्तेत जाण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. मात्र, महाराष्ट्रातील जनता या सर्व घडामोडी पाहत आहे. संबंधित नेत्याची नावे घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यानी सत्तेसाठी भूमिका बदलणाऱ्या नेत्यावर निशाणा साधला.
या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसची भूमिका सध्या थांबा आणि वाट पाहा अशीच असल्याचे वडेट्टीवार यानी सांगितले. महाराष्ट्राच्या हितापेक्षा सत्तेला महत्व देणाऱ्या नेत्याना आगामी काळात जनता नक्कीच धडा शिकवेल. देशाच्या हिताविरोधात भूमिका घेणाऱ्या शक्तींसोबत कोणी जाणार असेल, तर त्याचा हिशेब मतदार मतदानाच्या वेळी चुकता करतील. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत नेमका काय निर्णय होतो आणि संबंधित नेते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
