Chhatrapati SambhajiNagar राखीपौर्णिमेआधीच बहिणींचा भाऊ हिरावला; चांदगुडे कुटुंबाच्या दुःखाने गाव सुन्न

दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून गावातील अनेक घरांमध्ये चूल देखील पेटली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Untitled Design   2026 08 23T145138.435

Untitled Design 2026 08 23T145138.435

Village left numb by the Chandgude family’s grief : छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेत मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दरीत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या मुरलीधर दामोदर चांदगुडे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव (ता. अंबड) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच नातेवाईकांचा आक्रोश आणि ग्रामस्थ्यांच्या अश्रूंनी संपूर्ण वातावरण भहरावून गेले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून गावातील अनेक घरांमध्ये चूल देखील पेटली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी देखील नियतीने या कुटुंबाला वेगळे केले. संगीता यांच्या माहेरच्या नातेवाईकांच्या इच्छेनुसार संगीता आणि कुणाल यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर मुरलीधर यांच्यावर त्यांच्या जन्मभूमीत धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेली 15 ते 20 वर्षे छत्रपती संभाजीनगरमध्ये चालक म्हणून काम करणारे मुरलीधर चांदगुडे हे अत्यंत कष्टाळू आणि जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली. आपल्या मुलाने मोठं होऊन डॉक्टर व्हावे, हे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न होते. मात्र नियतीने एका क्षणात सर्व काही होरावून घेतले. मुलाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धावलेल्या पित्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावकरी देखील सुन्न झाले आहेत.

वाटाण्यावरुन संजय राऊत संतापले; फडणवीसांनी तो ‘कच्चा वाटाणा’ घरी नेऊन शिजवून खावा!

या घटनेमुळे मुरलीधर यांच्या वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धनगर पिंपळगावात राहणाऱ्या त्यांच्या वृद्ध आई-वडिलांचा आधारच हरपला आहे. शहरात राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच मुरलीधर गावाकडील आई-वडिलांची देखील काळजी घेत होते. आता वृद्धापकाळात त्यांचा सांभाळ कोण करणार, या प्रश्नाने गावकऱ्यांना देखील अस्वस्थ करून सोडले आहे.

अंत्यसंस्कारावेळी मुरलीधर यांच्या बहिणींनी फोडलेला टाहो उपस्थितांच्या काळजाला चिरणारा ठरला. दादा, आता राखीपौर्णिमेला आम्ही कोणाच्या हातावर राखी बांधायची? असा आर्त सवाल करत बहिणींनी हंबरडा फोडला. एकीकडे भावाच्या निधनाने व्याकुळ झालेल्या बहिणी, तर दुसरीकडे आपल्या मुलाचे पार्थिव पाहून कोसळलेले वृद्ध आई-वडील हे दृश्य पाहून उपस्थित ग्रामस्थ्यांना देखील अश्रू अनावर झाले.

मुरलीधर यांच्या अंत्ययात्रेला हजारो ग्रामस्थ्य उपस्थित होते. चुलत भाऊ राजू चांदगुडे यांनी त्यांना मुखाग्नी दिला. मुलासाठी जगणाऱ्या आणि कुटुंबासाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या या पित्याचा असा अंत झाल्याचे दुःख गावकरी अजूनही पचवू शकलेले नाहीत. त्यांच्या आठवणींनी संपूर्ण धनगर पिंपळगाव शोकसागरात बुडाले आहे.

हिंगोलीत कावड यात्रेत दोन डीजेंची भीषण धडक; रिव्हर्स घेत धडकवलेल्या वाहनांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

दरम्यान, या प्रकरणाचा तपास देखील सुरू आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नरेश ठाकरे यांनी संगीता यांच्या वडिलांसह इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत झाल्टा परिसरातील चांदगुडे कुटुंबाच्या घराची सुमारे तासभर तपासणी केली. तपासादरम्यान मुलगा कुणालच्या सर्व वह्या, रजिस्टर आणि अन्य साहित्याची बारकाईने पाहणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येच्या विचारांशी संबंधित कोणतीही नोंद आढळून आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या मुरलीधर चांदगुडेंच्या निधनाने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव पोरके झाले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version