21 दिवसांचं आमरण उपोषण ते राहुल गांधींसोबतचं आंदोलन; AISA’च्या नेहा बोरा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनात विद्यार्थी नेत्या नेहा बोरा या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत एकाच बसमध्ये दिसल्या.

News Photo   2026 10 12T173158.329

Neha Bora Congress Entry

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या (Cogress) राजीनाम्यासाठी तब्बल 21 दिवस दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन झालं. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे आमरण उपोषणाला बसले होते. 21 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं. दरम्यान, त्यांच्यासोबतच ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोराही आमरण उपोषणाला बसल्या होत्या. त्यांनीही 21 दिवस हे उपोषण केलं. त्या उपोषणाला यश आलं, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नेहा बोरा यांनी प्रत्येक राज्यात जाऊन देशातील राजकीय, सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करत मुद्दे मांडले होते.

प्रलंबित खटल्यांवर बैठकीची मागणी तत्त्वाविरोधी; CJI सूर्यकांत यांचं खरगे आणि राहुल गांधींना पत्र, दिला हा सल्ला

दरम्यान, त्या गेली दोन ते तीन महिन्यांपासून चर्चेत आलेल्या आहेत. त्यांनी दिल्लीतील आंदोलनानंतर राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेतही त्यांनी त्यांची मत मांडली होती. आज इंडिया आघाडीने दिल्लीत सर्व विरोधी पक्षांना सोबत घेत मोर्चा काढला होता. त्यामध्ये नेहा बोरा या राहुल गांधी, प्रियंका गांधी ज्या बसमध्ये होत्या त्याच बसमध्ये होत्या. त्यांनीही या आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळं आता नेहा बोरा या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांनी मागिल आंदोलनानंतर राहुल गांधी यांची भेट घेतल्यावरही हीच चर्चा सुरू झाली होती. आजही पुन्हा या चर्चेला तोंड फुटलं आहे.

कोण आहेत नेहा बोरा?

नेहा बोरा या विद्यार्थी नेत्या आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) या विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्या पीएचडीचं संशोधन करत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणातील कथित अनियमितता, बेरोजगारी आणि लोकशाही अधिकार यांसारख्या मुद्द्यांवर त्या आंदोलनांमध्ये सहभागी होत आल्या आहेत.

नेहा बोरा यांचं नाव 2019–20 मधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनांपासून चर्चेत येऊ लागलं. त्यानंतर परीक्षा पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. झारखंडमधील झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या (JSSC) भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दिला. या प्रकरणांतील अनियमिततेचे आरोप हे आंदोलनकर्त्यांचे दावे आहेत.

2026 मध्ये दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित आंदोलनादरम्यान नेहा बोरा यांचं नाव देशभरात चर्चेत आलं. मतदारयाद्यांमधून कथितरीत्या मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं वगळल्याच्या आरोपांवरून झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शनांमध्ये भूमिका बजावली. या आंदोलनात त्यांनी उपोषणही केलं. निवडणूक आयोगाकडून मतदारांची नावं वगळण्याबाबतचे आरोप नाकारण्यात आले आहेत.

Exit mobile version