वरिष्ठांचा विरोध, पण पार्थ पवार ठाम; झिशान सिद्दिकींना मुंबई अध्यक्षपद मिळणार?

Parth Pawar पार्थ पवारांच्या पाठिंब्यामुळे झिशान सिद्दिकींना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

Parth Pawar

Parth Pawar

With Parth Pawar’s backing Zeeshan Siddique : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सध्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या नियुक्त्यांची चर्चा सुरू असताना मुंबई अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचा या नावाला विरोध असल्याची चर्चा असतानाही, खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या पुढाकारातून सिद्दिकी यांना पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सिद्दिकी यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

‘तर तुम्ही नालायक गृहमंत्री आहात’; अमित शहांवर पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका

दोन वर्षांपासून मुंबई अध्यक्षपद रिक्त

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. समीर भुजबळ यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाकडून अद्याप कायमस्वरूपी अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईतील पक्ष संघटनेला नवा चेहरा देण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

1 सप्टेंबरला ओबीसी मुंबईत! हे आमचं शेवटचं आंदोलन म्हणत हाकेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मुंबई राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन कार्याध्यक्ष कार्यरत आहेत. त्यामुळे यापैकी एखाद्या कार्याध्यक्षाला थेट अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी पक्षातील काही नेत्यांची भूमिका असल्याचे समजते. मात्र, या मागणीऐवजी झिशान सिद्दिकी यांच्या नावाचा विचार होत असल्याने पक्षांतर्गत मतभेद पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेनंतर आता मुंबई अध्यक्षपद?

झिशान सिद्दिकी यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या निर्णयावर त्यावेळी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत सिद्दिकी यांचा पराभव झाला होता. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुलनेने नव्याने दाखल झाले असल्याने त्यांना विधानपरिषद देण्यामागचे कारण काय, असा प्रश्न पक्षांतर्गत पातळीवर उपस्थित करण्यात आला होता.

मात्र, पार्थ पवार यांच्या आग्रहामुळे सिद्दिकी यांना विधानपरिषदेवर संधी मिळाल्याचे बोलले गेले. आता त्याच पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदासाठीही त्यांच्या नावाचा विचार होत असल्याने राष्ट्रवादीच्या मुंबईतील राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये फक्त 9 महिला CEO; 25 MD, सरकारी आकडेवारीतून मोठी तफावत समोर

सिद्दिकी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास पक्षातील जुन्या आणि अनुभवी नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. विशेषतः संघटनेत काम करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये या निर्णयाची प्रतिक्रिया काय उमटते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

पार्थ पवारांचा पक्ष संघटनेवर प्रभाव वाढतोय?

गेल्या काही दिवसांतील पक्षांतर्गत नियुक्त्या आणि निर्णयांकडे पाहिल्यास पार्थ पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींमध्ये प्रभाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. युवक, युवती आणि विद्यार्थी संघटनांच्या महत्त्वाच्या पदांवर त्यांच्या विचारसरणीशी जवळीक असलेल्या व्यक्तींना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.

आम आदमी पक्षाची बी टीम की, पक्ष स्थापन करणार? दिपके म्हणाले, लोकांच्या मनात…

युवती अध्यक्ष म्हणून निर्मला नवले, तर विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आकाश झांबरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय पुणे विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयातही पार्थ पवार यांच्या भूमिकेची चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आता मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराच्या अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दिकी यांचे नाव पुढे येणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.

मुंबई राष्ट्रवादीत नव्या संघर्षाची शक्यता

मुंबई अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी संघटनात्मक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

एका बाजूला पक्षातील अनुभवी नेत्यांकडून कार्याध्यक्षांपैकी एखाद्याला अध्यक्षपद देण्याची मागणी होत असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे झिशान सिद्दिकी यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे अंतिम निर्णय झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कंपन्या बंद पडल्याचा विषय, पवारांची टीका, फडणवीसांचे उत्तर, त्यात रोहित पवारांची उडी

पार्थ पवार यांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दिकी यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मिळते का, याकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे मुंबईतील राष्ट्रवादीची आगामी संघटनात्मक दिशा आणि पक्षांतर्गत शक्तिसमीकरणेही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version