Download App

भारतीय विमानतळ प्राधिकरण 185 पदांसाठी भरती सुरू, महिन्याला पंधरा हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:

AAI Bharti 2023: दिवसेंदिवस देशात बेरोजगारी कमालीची वाढत आहे. त्यामुळं अनेकांना नोकरीची गरज असते. मात्र, पात्रता असूनही आज अनेकजण खाजगी नोकरी (Job) करतांना दिसतातत. मात्र, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत ‘ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांसाठी एकूण 185 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आम्ही 50 लाखांचा चेक दिला, फर्नांडिस कुटुंबियांना पुढं करून दमानिया यात राजकारण…; समीर भुजबळांकडून आरोपांचे खंडन 

यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 साठी अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस

एकूण पदांची संख्या- 185

शैक्षणिक पात्रता –

पदवी/डिप्लोमा: मान्यताप्राप्त संस्थेतून चार वर्षांची पदवी किंवा तीन वर्षांचा (नियमित) डिप्लोमा आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे ITI/NCVT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे आणि तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पहावी.

Manushi Chhillar : आजच्याच दिवशी मिळाला ‘मिस वर्ल्ड’ सन्मान; मानुषी छिल्लरचा प्रेरणादायक प्रवास 

वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

आवश्यक कागपदत्रे –
या पदभरतीसाठी अर्ज करतांना उमदेवारांना आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, गुन्हा नसल्याचे हमीपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, दहावी-बारावीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://www.aai.aero/

मासिक स्टायपेंड – 15,000 रुपये

नोकरीचे ठिकाण-
आग्रा, अलीगड, बिकानेर, हिस्सार, जोधपूर, गोरखपूर, जम्मू, जयपूर

असा अर्ज करा-
उमेदवारांना ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिससाठी ऑनलाइन अर्ज करावेत.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा.
उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांनुसारच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1Qv_rlDs5E-ZliUcYcCMlacLmnCBMkYjm/view

 

Tags

follow us