कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Published:
कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

Konkan Railway Corporation Limited : भारतीय रेल्वेचे ( Indian Railways) जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करत असते. आताही रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) अंतर्गत अॅप्रेटिंस पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिचर्ड केटलबरो फायनलसाठी ऑन फिल्ड अंपायर; पण भारतासोबत आहे अत्यंत दुर्देवी योगायोग 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. कोकण रेल्वे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

एकूण रिक्त पदे- 190

शैक्षणिक पात्रता –

पदवीधर प्रशिक्षणार्थी: संबंधित विषयातील अभियांत्रिकी.

जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रेंटिस: B.A/ B.Com/ B.Sc/ BBA/ BMS/ पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी.

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा.

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 25 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी प्रवर्ग – रु 100.
मागासवर्गीय/महिला/EWS – कोणतेही शुल्क नाही.

Chhagan Bhujbal : ‘संभाजीराजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत’; छगन भुजबळांनी संभाजीराजेंना सुनावलं 

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.

अधिकृत वेबसाइट – https://konkanrailway.com/

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – 15 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1atglxF-34KOm8ykZPs8WpzZhzFWTFiL2/view

अर्ज कसा करायचा-
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम वेबसाइटवर जा.
यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील भरून युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करतांना अर्जात काही उणीवा राहिल्यास नाकारला जाईल.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube