रिचर्ड केटलबरो फायनलसाठी ऑन फिल्ड अंपायर; पण भारतासोबत आहे अत्यंत दुर्देवी योगायोग

रिचर्ड केटलबरो फायनलसाठी ऑन फिल्ड अंपायर; पण भारतासोबत आहे अत्यंत दुर्देवी योगायोग

2014 T20 वर्ल्डकप, 2015 वनडे वर्ल्डकप, 2016 T20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 वनडे वर्ल्डकप- भारत-न्यूझीलंड सेमीफायनल, 2021 T20 वर्ल्डकप वर्ष बदलले, ठिकाणे बदलली, स्पर्धा बदलल्या आणि संघही बदलले. बदलले नाही ते या मॅचेसमधील भारताची टीम, रिचर्ड केटलबरो हे अंपायर आणि भारताचा झालेला पराभव. हा दुर्दैवी योगायोग म्हणा की आणखी काही. पण ज्या-ज्या नॉकआऊट मॅचमध्ये भारत असतो तिथे रिचर्ड केटलबरो अंपायर म्हणून असतात आणि तिथे तिथे भारताचा पराभव झालेला आहे. आता हेच केटलबरो यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-ऑस्ट्रेलिया फायनलला ऑन फिल्ड अंपायर असणार आहेत. (Richard Kettleborough will be the on-field umpire for the India-Australia final in the World Cup)

रिचर्ड केटलबरो नुकतेच चर्चेत आलेले ते भारत-बांग्लादेश मॅचमध्ये. पुण्याच्या स्टेडियमवरील या मॅचमध्ये विराट कोहली बॅटिंगला असताना त्याच्या शतकासाठी केटलबरो यांनी नसुम अहमदने लेग साईडला टाकलेला बॉल वाईड बॉल न दिल्याचा आणि पक्षपातीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण तो नियमानुसारच वाईड बॉल दिला नसल्याचे नंतर समोर आले होते. पण हेच केटलबरो आता पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया फायनलला ऑन फिल्ड अंपायर असणार आहेत.

कोण आहेत रिचर्ड केटलबरो?

रिचर्ड केटलबरो हे अतिशय प्रसिद्ध अंपायर आहेत. त्यांनी आतापर्यंत 112 टेस्ट मॅचमध्ये टीव्ही अंपायर आणि ऑन फिल्ड अंपायरची भूमिका बजावली आहे. तर 155 वनडे मॅचेसमध्ये ऑन फिल्ड आणि टीव्ही अंपायरची भूमिका बजावली आहे. त्यांनी 51 टी-20 मॅचेसमध्येही अंपायरिंगही केले आहे.

रिचर्ड केटलबरो इंग्लंडकडून फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळले आहेत. 33 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 1258 रन्स आणि 21 लिस्ट ए मॅचेसमध्ये 290 धावा केल्या आहेत. ते लेफ्टी टॉप ऑर्डर बॅट्समन आणि पार्टटाईम बॉलर होते. 2006 मध्ये त्यांना ECB च्या अंपायरिंग लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर 2009 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 मध्ये त्यांनी इंटरनॅशनल अंपायरिंगमध्ये पदार्पण केले.

World Cup Final : एक दिवसाचं भाडं एक लाख; फायनलआधीच अहमदाबादेत पैशांचा ‘खेळ’!

2011 मध्ये भारतात झालेल्या वर्ल्डकपमध्ये 18 अंपायरच्या पॅनेलमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्याच वर्षी, आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. वयाच्या 38 व्या वर्षी ते पॅनेलमधील सर्वात तरुण अंपायर म्हणून ओळखले जात होते. फक्त दोन वर्षांनंतर, 2013 मध्ये, त्यांना एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्यांना ICC ‘अंपायर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला.

रिचर्ड केटलबरोचे टीम इंडियाशी कनेक्शन :

गेल्या काही आयसीसी इव्हेंटमध्ये भारताच्या मॅचेसमध्ये रिचर्ड केटलबरो हे ऑन फिल्ड अंपायर म्हणून होते तेव्हा टीम इंडियासोबत काहीतरी अप्रिय घडले आहे. 2014 T20 वर्ल्डकप, 2015 वनडे वर्ल्डकप, 2016 T20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 वनडे वर्ल्डकप- भारत-न्यूझीलंड सेमीफायनल, 2021 T20 वर्ल्डकप वर्ष बदलले, ठिकाणे बदलली, स्पर्धा बदलल्या आणि संघही बदलले. बदलले नाही ते या मॅचेसमधील भारताची टीम, रिचर्ड केटलबरो हे अंपायर आणि भारताचा झालेला पराभव.

India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी

2019 मधील वनडे वर्ल्डकप- भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये जिथे महेंद्रसिंह धोनी रनआऊट झाला होता, त्यातही तेच ऑन फिल्ड अंपायर होते. आता हेच केटलबरो यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-ऑस्ट्रेलिया फायनलला ऑन फिल्ड अंपायर असणार आहेत. त्यामुळे भारतीय फॅन्सच्या मनात पुन्हा एकदा हा दुर्देवी योगायोग धडकी भरवत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube