2-minute test and the life of mother and baby is safe; Know more about this test during pregnancy : गर्भावस्थेदरम्यान बहुतेक लोक चांगला आहार, पुरेशी विश्रांती आणि बाळाच्या वाढीकडे विशेष लक्ष देतात. मात्र, याच काळात एक छोटाशी पण अत्यंत महत्त्वाची टेस्ट अनेकदा दुर्लक्षित राहतो. ही टेस्ट अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण होते, पण डॉक्टरांच्या मते तो आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचवू शकते. हा टेस्ट म्हणजे ब्लड प्रेशर (रक्तदाब) तपासणी. अनेक महिलांना कोणतीही त्रासदायक लक्षणे जाणवत नसल्यामुळे त्या या तपासणीकडे गांभीर्याने पाहत नाहीत.
महिना 11 लाख रूपये सॅलरी तरीही पैसा पुरेना अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याने सांगितलं खर्चाच गणित…
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, गर्भावस्थेत होणारा उच्च रक्तदाब आणि विशेषतः प्रीक्लेम्पसिया ही जगभरातील मातामृत्यूची मोठी कारणे आहेत. धोक्याची बाब म्हणजे ही समस्या अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे न देता हळूहळू वाढत जाते. महिला स्वतःला पूर्णपणे सामान्य समजत असते, पण शरीराच्या आत रक्तदाब वाढत असतो.
AIDMK’ला दुसरा मोठा धक्का; तीन आमदारांचा राजीनामा, काय घडलं?
आर्टेमिस हॉस्पिटलच्या ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनाकॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. रेनू रैना सहगल सांगतात की, डिजिटल किंवा मॅन्युअल बीपी मॉनिटरद्वारे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशर तपासले जाते. यासाठी दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो, पण शरीर गर्भावस्थेत कसे जुळवून घेत आहे हे समजण्यास मदत होते.
2029 ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? युगेंद्र पवार म्हणाले एका वर्षात खूप काही गोष्टी…
काही प्रकरणांमध्ये डॉक्टर “रोल-ओव्हर टेस्ट” देखील करतात, विशेषतः गर्भावस्थेच्या 28 ते 32 आठवड्यांदरम्यान. या टेस्टमध्ये महिला प्रथम डाव्या कुशीवर झोपते आणि नंतर पाठ टेकून झोपते. जर डायस्टोलिक बीपी 20 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त वाढला, तर तो धोक्याचा इशारा मानला जातो.
राष्ट्रवादीत काय चाललय?….आमदाराला राजीनामा देण्याच्या सूचना?, काय घडलं?
गर्भावस्थेत वाढलेला रक्तदाब आईसह बाळासाठीही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्लेसेंटापर्यंत रक्तपुरवठा कमी होऊ शकतो, ज्यामुळे बाळाला ऑक्सिजन आणि पोषण योग्य प्रमाणात मिळत नाही. परिणामी कमी वजनाचे बाळ, अकाली प्रसूती किंवा इतर गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नियमित तपासणी आणि योग्य मॉनिटरिंग अत्यंत गरजेचे मानले जाते.
