राष्ट्रवादीत काय चाललय?….आमदाराला राजीनामा देण्याच्या सूचना?, काय घडलं?

दिवंगत अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून नायकवडी यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार केले होते.

News Photo   2026 05 25T172231.910

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपाल कोट्यातली (MLA) आमदार इद्रीस नायकवडी यांना राजीनामा देण्याची सूचना देण्यात आली असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनी प्रसिद्ध केलं आहे. 15 दिवासंपूर्वी मंत्र्याच्या ओएसडीने नायकवडी यांची भेट घेत त्यांना राजीनामा देण्याविषयीचा निरोप दिला होता. राष्ट्रवादीतील युवा नेतृत्वावाला त्यांचा राजीनामा हवा असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

या वृत्तावर इद्रीस नायकवडी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पक्षातील काही जणांकडून अशा वावड्या उठवल्या जात आहेत.पक्षांतर्गत काही लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसाव्यात त्यामुळं ते अपेक्षा करत असतील. मात्र, माझ्याकडं पक्षाकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली नाही. तसंच, मी आमदार आहे. माझ्याकडं अनेक ओएसडी येत असतात. परस्पर चर्चा घडवत असतील माझ्यापर्यंत निरोप आला नाही असंही ते म्हणाले.

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप विरोधात वाचला सुनेत्रा पवारांसमोर तक्रारींचा पाढा

इद्रिस नायकवडी यांची नेमणूक राष्ट्रवादीच्या कोट्यातून 2024 मध्ये झाली होती. त्यांच्या कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर पद भूषवले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. 15 दिवसांपूर्वी आमदार नायकवडी यांना मंत्र्यांच्या ओएससीडीकडून राजीनामा देण्याचे निरोप पाठवण्यात आला होता. शिवाय स्वतः ओएसडी राजीनाम्याचा नमुना घेऊन आमदार नायकवडी यांना भेटले होते.

यावेळी आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका नायकवडी यांनी घेतल्याचं सांगितले जाते होतं. मात्र, नायकवडी यांनी त्याला ठाम नकार दिला. मात्र, आता त्यांनी स्वतः अशी कुठली मागणी आपल्याकडं केली गेली नसल्याचं म्हटलं आहे. दिवंगत अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून नायकवडी यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार केले होते. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहेत.

उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे. या बैठकीत त्यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची शक्यता देखीव वर्तवली जात आहे. दरम्यान, आमदार ईद्रीस नायकवडी हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर देखील होते. त्यावेळी देखील त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. आता देखील आपण कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जर आमदार नायकवडी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यास स्वतः राज्यपाल त्यांचा राजीनामा घेण्याची तरतूद आहे.

follow us