Bitcoin Price : भारतीय बाजारासह गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात देखील सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या मोठा फायदा होताना दिसत आहे. बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1.20 लाख रुपयांवर पोहोचली आहे तर चांदीची किंमत प्रति किलो 1.50 लाख रुपयांवर पोहोचली आहे. माहितीनुसार, चांदीने गेल्या वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल 60% परतावा दिला आहे, तर सोन्याने गुंतवणूकदारांना 55% परतावा एका वर्षात दिला आहे. मात्र पुढील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमती कमी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुढील काही दिवसात बिटकॉइनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात बिटकॉइनमध्ये (Bitcoin Price) मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. बिटकॉइनमध्ये गेल्या आठवड्यात 9% पेक्षा जास्त होती ज्यामुळे त्याने $123,966 चा उच्चांक गाठला. तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) , इथेरियम (Ethereum) , 2% वाढून $4,479.59 वर पोहोचली, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, XRP, 1.8% वाढून $3.03 वर पोहोचली. अमेरिकन सरकारच्या शटडाऊनभोवतीच्या अनिश्चिततेमुळे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा (Standard Chartered Bank) अंदाज आहे की बिटकॉइन लवकरच $135,000 पर्यंत पोहोचू शकते.
गेल्या काही दिवसांत फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा असल्याने ही वाढ झाली आहे. जेव्हा व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असते तेव्हा क्रिप्टोसारख्या धोकादायक मालमत्तेमध्ये गुंतवणूक वाढते. बिटकॉइन एक्सचेंज-ट्रेडेड फंडांमध्ये वाढती गुंतवणूक. या नियंत्रित निधीद्वारे बिटकॉइनमध्ये अधिकाधिक संस्थात्मक गुंतवणूकदार भाग घेत आहेत. अमेरिकन सरकारच्या बंदमुळे गुंतवणूकदार बिटकॉइनला सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहण्यास प्रवृत्त झाले आहेत.
व्यवसायात होणार फायदा अन् मिळणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल?
काही अंदाजानुसार बिटकॉइन वर्षाच्या अखेरीस $143,000 पर्यंत पोहोचू शकते, तर काहींना वाटते की ते $138,000 च्या आसपास राहील. तर बिटकॉइनमध्ये $125,000 किंवा त्याहून अधिक वाढ होण्याची देखील शक्यता बाजारात वर्तवण्यात येत आहे.