मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत YouTube चॅनेल हॅक; अमेरिकन कंपनीच्या व्हिडिओचे प्रमोशन

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनेल हॅक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 09 20T115530.806

Supreme Court YouTube Channel Hacked : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनेल हॅक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या या चॅनलवर अमेरिकी कंपनी रिपल लॅब्सद्वारा विकसित क्रिप्टोकरेंसी XRP ला चालना देणारे व्हिडिओ दाखवले जात आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत यु-ट्युब चॅलनवरून महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी प्रसारित केली जाते. पण सध्या हे चॅलन हॅक करण्यात आले असून, चॅनलवर यापूर्वीचे कोणतेच जुने व्हिडिओ दिसत नसून, अमेरिकन कंपनी असलेल्या Ripple Labs ने विकसित केलेल्या क्रिप्टोकरन्सीबद्दची माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत.अलीकडेच, कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आली होती.

Video : PM मोदींसमोरचं CM एकनाथ शिंदेंचे डिमोशन; आता मुख्यमंत्री कोण?

चॅनल रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू 

सुप्रीम कोर्टाचे यूट्युब चॅनलचं हॅक झाल्याने एकीकडे आश्चर्य व्यक्त केले जात असून, दुसरीकडे आयटी टीमकडून हॅक करण्यात आलेले चॅनल रिकव्हर करण्यचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. सु्प्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनलवर गेल्यास हे चॅल उपलब्ध नसल्याचे अधोरेखित केले जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनलवर दोन लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

भारताचा डंका जगभरात वाजणार; रेटिंग एजन्सी​चा खुश करणारा अहवाल आला

मोठ्या नफ्याचे आश्वासन देऊन फसवणूक

सुप्रीम कोर्टाच्या चॅनलवर दाखवण्यात येणाऱ्या रिपल कंपनीकडून गुंतवणुकदारांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून त्यांची फसणूक करतात. यासाठी स्कॅमर लाखो सबस्क्रायबर्स असलेल्या हॅक केलेली YouTube खाती वापरतात. त्यानंतर हॅक केलेले खाते हे रिपलचे खरे खाते आहेत असा विचार करून लोक फसतात.

follow us