भारतीय यूजर्सला मोठा झटका, YouTube Premium 58 टक्क्यांनी महाग

भारतीय यूजर्सला मोठा झटका, YouTube Premium 58 टक्क्यांनी महाग

YouTube Premium: देशात गेल्या काही वर्षांपासून YouTube चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण YouTube Premium च्या मदतीने देखील आपले दररोजचे काम करत आहे. जर तुम्ही देखील YouTube Premium वापरात असाल तर तुमच्या खर्च्यात वाढ होणार आहे. याच कारण म्हणजे Google ने भारतीय यूजर्ससाठी YouTube Premium प्लॅन महाग केला आहे.

माहितीनुसार, YouTube Premium प्लॅन भारतीय यूजर्ससाठी 58 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. कंपनीने स्टुडंट, फॅमिली आणि पर्सनल YouTube Premium च्या तिन्ही प्रकारच्या प्लॅनच्या किमती वाढल्या आहेत.

YouTube Premium प्लॅनच्या नवीन किमती

YouTube Premium स्टुडंट मासिक प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत 12.6 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आता यूजर्सला 79 रुपये नाही तर 89 रुपये मोजावे लागणार आहे. तर पर्सनल YouTube Premium साठी 149 रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी या रिचार्जसाठी 129 रुपये होती. यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे YouTube Premium फॅमिली प्लॅनसाठी आता यूजर्सला 299 रुपये खर्च येणार आहे. यापूर्वी या रिचार्जसाठी 189 रुपये मोजावे लागत होते. कंपनीच्या नवीन निर्णयानुसार या प्लॅनमध्ये 58 टक्क्यांनी किंमत वाढ करण्यात आली आहे.

मोठी बातमी! संपूर्ण देशात 5 दिवसांसाठी पासपोर्ट सेवा ठप्प राहणार, ‘हे’ आहे कारण

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्लॅन नवीन आणि विद्यमान यूजर्ससाठी आहे. YouTube Premium मध्ये तुम्हाला जाहिरात फ्री, ऑफलाइन डाउनलोड प्लेबॅक हिस्ट्री आणि जाहिरात फ्री YouTube म्युजिक मिळतो.

हर्षवर्धन पाटील-पवारांमध्ये पुण्यात अडीच तास खलबतं; ‘तुतारी’ चा प्रश्न येताच घेतलं फडणवीसांचं नाव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube