मोठी बातमी Google Down! Gmail, YouTube वापरण्यात अडचण
Google Down : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जगभरातील गुगल यूजर्सना Gmail, Search, YouTube आणि इतर गुगलच्या सर्विस वापरण्यात अडचण येत आहे.
माहितीनुसार 12 ऑगस्ट रोजी जगभरातील विंडोज आउटेजमुळे ही समस्या समोर आली आहे. अनेक यूजर्सने आतापर्यंत याबाबात तक्रार केली आहे. जगभरातील ऑनलाइन आउटेजवर लक्ष ठेवणारी वेबसाईड डाउनडिटेक्टर (Downdetector) ने ‘एरर’ सिग्नल दाखवले.
डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क शहरामध्ये यूज़र्सना सर्वात जास्त त्रास होत आहे. तर ह्यूस्टन, सॅन फ्रान्सिस्को, डॅलस, बोस्टन आणि शिकागोमध्ये देखील यूज़र्सना काही प्रमाणात त्रास होत असल्याची माहिती डाउनडिटेक्टरने दिली आहे. मात्र या समस्या का? येत आहे याबाबात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
78 वा स्वातंत्र्यदिन; राजधानी दिल्लीत कडकोट सुरक्षा, PM मोदींच्या सुरक्षेसाठी 10 हजार कमांडो…