Gmail यूजर्संना खुशखबर! आता मोबाईलवर लॅग्वेज ट्रान्सलेशनचा पर्याय

Gmail यूजर्संना खुशखबर! आता मोबाईलवर लॅग्वेज ट्रान्सलेशनचा पर्याय

Gmail Translation Feature: Google ची ईमेल सेवा Gmail ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. आता Google ने Gmail अॅपमध्ये एक नवीन फीचर जारी केले आहे. याद्वारे यूजर्स संपूर्ण ईमेलचे भाषांतर करू शकणार आहेत. याआधी हे फीचर फक्त वेब व्हर्जनवर उपलब्ध होते. पण आता कंपनीने Gmail च्या Android आणि iOS अॅप्सवरही हे फीचर आणण्यास सुरुवात केली आहे.

Google ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘गेल्या काही वर्षांपासून, आमच्या यूजर्संनी 100 हून अधिक भाषांमध्ये वेब व्हर्जनवर Gmail मध्ये त्यांचे ईमेल सहजपणे भाषांतरित केले आहे. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आजपासून Gmail मोबाइल अॅपमध्ये नेटिव्ह ट्रान्सलेशन इंटिग्रेशन उपलब्ध होईल. यामुळे यूजर्संना विविध भाषांमध्ये सहज संवाद सुरू ठेवता येईल.

Kerala : नाव बदलाचं लोण आता दक्षिण भारतात; केरळच्या नावात होणार लवकरच बदल

Gmail मध्ये ट्रान्सलेशन फीचर कसे कार्य करेल?
जीमेलमधील हे फीचर ईमेलमध्ये लिहिलेल्या कॉन्टेन्टची भाषा ओळखेल आणि नंतर ईमेलच्या वरच्या बाजूला दिसणारा एक बॅनर वापरकर्त्यानी सेट केलेल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही हिंदीमध्ये ईमेल लिहिला असेल आणि यूजर्सची भाषा इंग्रजी असेल, तर तुम्ही भाषांतरित मजकूर पाहण्यासाठी Translate to English वर टॅप करू शकता.

Sharad Pawar गटाला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीला कंटाळून ‘या’ नेत्याने ठोकला रामराम

जर यूजर्संना ईमेलचे भाषांतर करायचे नसेल, तर तुम्ही बॅनर डिसमिस करू शकता. किंवा तुम्ही ईमेलचे भाषांतर न करण्याचा पर्याय निवडू शकता. याशिवाय सेटिंग्जमध्ये जाऊन भाषांतर प्राधान्येही कस्टमाइज करता येतात. सेटिंग्जमध्ये, वापरकर्ते नेहमी भाषांतरासाठी वापरायची भाषा निवडू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube