मोठी बातमी! संपूर्ण देशात 5 दिवसांसाठी पासपोर्ट सेवा ठप्प राहणार, ‘हे’ आहे कारण

मोठी बातमी! संपूर्ण देशात 5 दिवसांसाठी पासपोर्ट सेवा ठप्प राहणार, ‘हे’ आहे कारण

Passport Appointment : जर तुम्ही देखील नवीन पासपोर्ट काढण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट विभागाचे पोर्टल (Passport Appointment) 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद रहाणार आहे त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी 5 दिवस अपॉइंटमेंट मिळणार नाही.

याच बरोबर जर तुम्ही यापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान अपॉइंटमेंट मिळाली असेल तर तुम्हाला ती अपॉइंटमेंट दुसऱ्या तारखेसाठी पुन्हा शेड्यूल करावी लागेल अशी माहिती पासपोर्ट विभागाने दिली आहे. तसेच या कालावधी दरम्यान कुणालाही नवीन अपॉइंटमेंट मिळणार नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे पाच दिवस पोर्टलबंद राहणार असल्याची देखील माहिती पासपोर्ट विभागाकडून देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे पाच दिवस पोर्टल बंद असल्याने याचा परिणाम प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये, अर्जदारांची पोलीस पडताळणी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजावर होणार आहे.

पाच दिवस पोर्टलबंद राहणार असल्याने देशातील संपूर्ण अर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ज्या अर्जदारांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली आहे त्यांनी आतापासूनच दुसऱ्या तारखेसाठी पुन्हा शेड्यूल करावा आणि नवीन अपॉइंटमेंट घ्यावा अशी विनंती केली आहे तसेच या कालावधीत कुणालाही नवीन अपॉइंटमेंट मिळणार नाही अशी माहिती पासपोर्ट विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

भारतात किती प्रकारचे पासपोर्ट आहेत?

भारतीय पासपोर्टचे तीन प्रकार आहे.

ब्लू कव्हर पासपोर्ट, मरून कव्हर पासपोर्ट आणि ग्रे कव्हर पासपोर्ट

ब्लू कव्हर पासपोर्ट म्हणजे सामान्य पासपोर्ट हा पासपोर्ट कोणत्याही भारतीय नागरिकाला जारी केला जाऊ शकतो.

मरून कव्हर पासपोर्ट म्हणजे भारत सरकारद्वारे अधिकृत राजनैतिक/शासकीय पदे धारण केलेल्या सदस्यांना जारी करण्यात येतो.

हर्षवर्धन पाटील-पवारांमध्ये पुण्यात अडीच तास खलबतं; ‘तुतारी’ चा प्रश्न येताच घेतलं फडणवीसांचं नाव

ग्रे कव्हर पासपोर्ट म्हणजे अधिकृत पासपोर्ट परदेशात नियुक्त केलेल्या नियुक्त सरकारी नोकरांना किंवा अधिकृत असाइनमेंटवर सरकारने विशेष अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला जारी करण्यात येतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube