Download App

Iphone : हेरगिरी अन् हॅकिंगपासून असं संरक्षण करा; आयफोनच्या ‘या’ फिचरबद्दल माहितीये का?

Iphone : अ‍ॅपल आयफोन युजर्सचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. देशातील अनेक बड्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर येत असतानाच आता आयफोनमधील एका फिचरमुळे तुम्ही हेरगिरी आणि हॅकिंगपासून संरक्षण करु शकणार आहात. आयफोनच्या या फिचरबद्दल जाणून घेऊयात…

Chandrakant Patil : …’त्या’ मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रही देण्यात येणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

आयफोनचे फोनमध्येच ‘लॉकडाऊन मोड’ फिचर समाविष्ट आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सला हॅकिंगसंदर्भात अलर्ट मिळतात. अशाप्रसंगी आयफोन युजर्सने फीचर ताबडतोब चालू करावे. या फीचरच्या मदतीने युजरचे कमीत कमी नुकसान होणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Maratha Reservation : राजीनामा सत्र सुरुच! आतापर्यंत चार आमदार अन् दोन खासदारांनी उपसलं हत्यार

लॉकडाऊन मोड म्हणजे काय?
नावासारखंच काम हा फिचर करतो. हा एक पर्याय मोड आहे आणि त्यात अनेक संरक्षणे उपलब्ध आहेत. डिजिटल धोके असणाऱ्यांसाठी हे फिचर समाविष्ट करण्यात आलं आहे. हे फिचर चालू केल्यानंतर तुमचे डिव्हाइस पूर्वीसारखे काम करणार नाही. हेरगिरी आणि हॅकिंगपासून वाचण्यासाठीच हे फिचर आहे. हे फिचर सुरु केल्यानंतर युजर्स इतर फिचर वापरु शकणार नाही. हे फिचर iOS 16, iPad OS 16, Watch OS 10 आणि macOS Ventura आणि नंतरच्या फोनमध्ये उपलब्ध आहे.

Maratha reservation : जाळपोळीचं लोन आता नगरमध्येही, रोहित पवारांच्या मतदारसंघात जाळले टायर

फिचर चालू कसं होतं?
फिचर चालू करण्‍यासाठी, तुमच्‍या डिव्‍हाइसला नवीनतम सॉफ्टवेअरवर अपडेट करणे आवश्‍यक आहे. तुम्ही तुमच्या iPhone, iPad आणि Mac वर हे फिचर चालू करू शकता. आयफोन किंवा आयपॅडवर हे फीचर ऑन करण्यासाठी आधी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला Privacy & Security वर क्लिक करावे लागणार आहे.

तुम्हाला लॉकडाऊन मोड पर्यायावर स्क्रोल करावे लागणार आहे. तुम्ही येथे टॅप करून हे फिचर चालू करू शकता. यानंतर तुम्हाला डिव्हाइस रीस्टार्ट करावे लागेल आणि नंतर तुमचा पासकोड टाकावा लागणार आहे. Mac वर हे फिचर चालू करण्यासाठी, तुम्हाला सिस्टम सेटिंग्जमध्ये जावे लागणार आहे. येथे तुम्हाला Privacy & Security चा पर्याय मिळेल. यावर क्लिक करून तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल. तिथे तुम्हाला लॉकडाउन मोडचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करून तुम्ही फीचर चालू करू शकता. तुम्हाला तुमचा वापरकर्ता पासवर्ड पुन्हा टाकावा लागणार आहे. यानंतर यूजर्सला टर्न ऑन आणि रीस्टार्ट वर क्लिक करावे लागणार आहे. अशा प्रकारे Mac वर लॉकडाउन मोड चालू होईल.

Tags

follow us