Apple Smart Glasses : बाजारता लवकरच अॅपल आपला स्मार्ट ग्लास ( Smart Glasses) लॉंच करणार आहे. या ग्लासमध्ये एकापेक्षाएक जबरदस्त फीचर्स कंपनीकडून देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बाजारात अॅपल पुढील वर्षी स्मार्ट ग्लास (Apple Smart Glasses) लॉंच करणार आहे. आकर्षक डिझाइनसह बाजारात अॅपल स्मार्ट ग्लास लॉंच करणार आहे.
मीडिया रिपोर्टसनुसार, या स्मार्ट ग्लासमध्ये बिल्ट-इन कॅमेरा (Built-in Camera) , मायक्रोफोन आणि स्पीकर सारखे फीचर्स देण्यात येणार आहे. या फीचर्सच्या मदतीने तुम्ही बाहेरील जगाचे विश्लेषण करू शकतात आणि सिरी व्हॉइस असिस्टंटद्वारे रिक्वेस्ट स्वीकारू शकणार आहे. स्मार्ट ग्लासमध्ये फोन कॉल, म्यूजिक, लाईव्ह, ट्रान्सलेशन आणि टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश सारखे फीचर्स असणार आहे. हे फीचर्स मेटाच्या स्मार्ट ग्लासेसमध्ये देखील उपलब्ध आहे.
अॅपलचे मुख्य उद्दिष्ट ऑगमेंटेड रिअॅ लिटी ग्लासची जोडी सादर करणे आहे. महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या एका अहवालात असे सुचवण्यात आले होते की अॅपल स्मार्ट ग्लासेससाठी समर्पित चिपवरही काम करत आहे. असे म्हटले जाते की अॅपलचे स्मार्ट ग्लास मेटा ग्लासेससारखेच असतील, परंतु ते अधिक चांगल्या पद्धतीने डिझाइन केले जातील. सध्या मेटाचे स्मार्ट डिव्हाइस लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत.
iPhone 15 वर चक्क 11,797 रुपयांचा डिस्काउंट, खरेदीची सुवर्णसंधी
तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, अॅपल 2026 च्या अखेरीस आपला पहिला फोल्डेबल फोन सादर करण्याची तयारी करत असल्याचा दावा सध्या काही मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.